रोखठोक लिखाण आणि ज्याचे माप त्याच्या पदरात घालण्याची हिंमत दाखवणारे टीकात्मक लिखाण करण्यासाठी दांडगा अभ्यास लागतो, स्वतःच्या ज्ञानावर विश्वास लागतो आणि आपल्या मतांशी ठाम राहण्याचा निर्धार लागतो. मराठीत अशा बेधडक वृत्तीचे आणि निधड्या छातीचे जे अगदीच मोजके समीक्षक झाले त्यात श्री. के. क्षीरसागर हे नाव ठळकपणे घ्यावे लागते. आपला मुद्दा मांडतांना ते कोणाचीही पत्रास बाळगत नसत. भाषाशुध्दीचा आग्रह धरणारे बॅरिस्टर सावरकर आणि फारशीच्या हव्यासातून मराठीला परकीय शृंगार करू पाहणारे माधव ज्युलियन अशा दोन्ही टोकांना ते लेखणीच्या टोकावर घेण्यास कचरले नाहीत. भाषाशुद्धी अथवा काळाच्या ओघात होणारे बदल या संबधी समाज स्वतःच शहाणा असतो, त्यांस काही फार शहाणपणा सांगणे गरजेचे नाहीत, या भूमिकेतून क्षीरसागर यांनी सुनावलेले हे खडे बोल अर्धशतकानंतरही लागू होतात. पुणे येथे महाराष्ट्र शारदा मंदिरात १५ डिसेंबर १९३५ रोजी त्यांनी "खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी अर्थात सावरकर आणि पटवर्धन" या नावाचा एक निबंध वाचला. पुढे सह्याद्री मासिकाच्या फेब्रुवारी आणि मार्च १९३६ या दोन अंकातून तो प्रसिद्ध झाला. समीक्षक, टीकाकार, लेखक अशा विविध भूमिकांमधून मराठीची श्रीमंती वाढविणारे क्षीरसागर मुळात शिक्षक-अध्यापक होते. राक्षसविवाह ही कांदबरी, उमरखय्यांची फिर्याद, तसबीर आणि तकदीर हे आत्मचरित्र अशी विविध संपदा असणारे क्षीरसागर १९५९ साली मिरज येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. २९ एप्रिल १९८० रोजी त्यांचे निधन झाले. ********** अंक - सह्याद्री, फेब्रु-मार्च १९३६ आपली मराठी भाषा अशुद्ध होत चालली आहे व ती शुद्ध राखण्याकरिता फारशी व इंग्रजी शब्दांना वाळीत टाकावे असा प ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
सह्याद्री
, समाजकारण
, भाषा
, भाषाशुद्धी
Vilas wagholikar
5 वर्षांपूर्वीभाषाशुद्धी मध्ये काळाप्रमाणे लिखाण पध्दतीत बदलही येणे अपेक्षित आहे. मराठीतील नवीन शुद्ध लेखन नियम आपण स्वीकारले. आता, ऱ्हस्व दीर्घ चे नियम सहज कळतील असे सुलभ व्हायला हवेत.
abhinav benodekar
5 वर्षांपूर्वीस्वा ..सावरकर अप्रिय सत्य नेहमीच बोलत /लिहीत राहिले .सुरवातीला जरी त्यांच्यावर टीकेची झोड उठली तरी कालांतराने त्यांचे विचार रुजलेत . अन असे होईल असा त्यांचा दुर्दम्य विश्वास होता !
ajitpatankar
7 वर्षांपूर्वीश्री.के.क्षीरसागर यांचा लेख १९३६ सालचा फारच घाईघाईने लिहिला असावा. भारत स्वतंत्र होईपर्यंत त्यांनी वाट बघायला हवी होती. जी.ए. कुलकर्णी यांच्या एका कथेत पुढील अर्थाचे एक वाक्य आहे (शब्दश: आठवत नाही) “एखादे झाड उंच ठरवायचे आणि इतर सर्व झाडांचे शेंडे कापून टाकायचे. म्हणजे आपण ठरविलेले झाड आपोआप उंच दिसते”. श्री.के.क्षीरसागर यांचा असाच प्रयत्न दिसतो. स्वा. सावरकरांना भाषाशुद्धीवरून झोडपायचे हा एकमेव उद्देश ठेवून हा लेख लिहिला आहे. त्यात सखोल विचार नाहीच. त्यांनी उदाहरण म्हणून दिलेले उतारे अस्थानी आहेत. स्वा. सावरकरांचा मुख्य भर इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द प्रचलित करणे हा होता. स्वा. सावरकर हे नेहेमीच काळाच्या पुढे होते. भाषाशुद्धीपुरते बोलायचे तर खाली दिलेले शब्द स्वा. सावरकरांची देणगी आहे. हे सर्व शब्द आज सर्वमान्य व प्रचलित आहेत. दिनांक (तारीख),क्रमांक (नंबर),बोलपट (टॉकी),नेपथ्य,वेशभूषा(कॉश्च्युम),दिग्दर्शक (डायरेक्टर),चित्रपट (सिनेमा),मध्यंतर (इन्टर्व्हल),उपस्थित (हजर),प्रतिवृत्त (रिपोर्ट),नगरपालिका (म्युन्सिपाल्टी),महापालिका (कॉर्पोरेशन),महापौर (मेयर),पर्यवेक्षक ( सुपरवायझर),विश्वस्त (ट्रस्टी),त्वरित (अर्जंट),गणसंख्या (कोरम), स्तंभ ( कॉलम),मूल्य (किंमत),शुल्क (फी),हुतात्मा(शहीद),शिरगणती(खानेसुमारी), विशेषांक(खास अंक) सार्वमत (प्लेबिसाइट),नभोवाणी (रेडिओ),दूरदर्शन (टेलिव्हिजन),दूरध्वनी (टेलिफोन),ध्वनिक्षेपक (लाउड स्पीकर) विधिमंडळ ( असेम्ब्ली),अर्थसंकल्प (बजेट),क्रीडांगण (ग्राउंड),प्राचार्य (प्रिन्सिपॉल),मुख्याध्यापक (प्रिन्सिपॉल),प्राध्यापक (प्रोफेसर),परीक्षक (एक्झामिनर),शस्त्रसंधी (सिसफायर),टपाल (पोस्ट),तारण (मॉर्गेज),संचलन (परेड),नेतृत्व (लिडरशीप),सेवानिवृत्त (रिटायर्ड),वेतन (पगार). वॉलपोस्टर – भिंतीपत्रक, आउट डोर शूटिंग – बाह्यचित्रण, थ्री डायमेनशन – त्रिमितीपट, एडिटर – संकलक, नापास : अनुत्तीर्ण, पार्लमेंट : संसद, लोकसभा स्वा. सावरकरांचा लिपीबदल करायचा आग्रह मात्र पचला नाही. स्वा. सावरकरांनी असे अनेक शब्द तयार केले. काही अगदीच क्लिष्ट होते. ते स्वीकारले गेले नाहीत. पण त्यांनी मराठीभाषेला एक नवी दिशा दिली. ज्या गोष्टी मुळातच परकीय आहेत त्यांना प्रतिशब्द शोधण्याच्या अट्टहास नको. उदा. हेलिकॉप्टर, हेलिपॅड, इत्यादी. तरीदेखील Astronaut ला अंतराळवीर हा प्रतिशब्द शोधलाच की! आज इंग्रजीचे महत्त्व अनेक कारणांनी वाढल्याने, बोलीभाषेत इंग्रजी शब्दांचा वापर वाढला आहे. ते कालचक्रानुसार अपरिहार्य आहे. तरीदेखील स्वा. सावरकरांचे भाषाशुद्धीच्या प्रयत्नांचे ऋण मान्य करायलाच हवे.
hpkher
7 वर्षांपूर्वीरोख ठोक आहे, अनेक निरीक्षणे बरोबर आहेत सावरकरांच्या शब्द निर्मितीतील योग्य शब्द रूढ झाले आहेत. पु ल देशपांडे यांनी पण अशाच स्वरूपाचा लेख शासकीय शब्द कोषावर लिहिला होता त्याची आठवण होते.