कादंबरीकार, नाटककार म्हणून जयवंत दळवी नेहमीच विकार वासनांच्या आवर्तनात घुसळत असलेल्या व्यक्तिरेखांकडे आकर्षित होत राहिले. गंभीर भाष्य करत राहिले. परंतु हलकेफुलके, ललित लेखन करत असताना मात्र त्यांनी विविध वृत्ती, प्रवृत्तीची फिरकी घेत सार्वजनिक जीवनातील अनेकांचे बुरखे फाडले, कधी ओरखडे काढले तर कधी त्यांना गुदगुल्या करून सळोे की पळो करून सोडले. ठणठणपाळ या नावाने लिहिलेले सदर, अलाने-फलाने, विनंती विशेष ही 'ललित' मासिकातील सदरे त्यांच्या या शैलीमुळे आजही लक्षात आहेत. त्यांनीच लोकप्रिय केलेल्या पत्रोत्तर शैलीतील हे 'शालजोडीत'ले मार्मिक शब्दांचे फटकारे आहेत. साहित्यक्षेत्र आणि त्यातील पुरस्कार; हा थट्टेचा, हेटाळणीचा, द्वेषाचा आणि कुरघोडीचाही असलेला अत्यंत नाजूक विषय. या पुरस्कार प्रक्रियेचा दळवी यांनी यात घेतलेला 'वेध' अचूक आणि मर्मस्थानी बसणारा आहे. त्याची गंमत वाचता वाचता उलगडत जाते- दिवाळी अंक - पुस्तक पंढरी, १९८१ आदरणीय तात्यासाहेबः सप्रेम नमस्कार [caption id="attachment_8947" align="alignright" width="181"]दळवी[/caption] खूप दिवसांनंतर तुम्हाला पत्र लिहिण्याचा योग येतो आहे, याचा मनापासून आनंद वाटत आहे. मध्यंतरी बरेच महिने मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही, किंवा पत्रही लिहू शकलो नाही. त्याबद्दल क्षमा असावी. मला तुम्हाला भेटता आले नाही याचे मुख्य कारण जवळजवळ गेले वर्षभर एका नवीन कादंबरीच्या लेखनात गुंतलो होतो. गेल्या वर्षी परीक्षक समितीचे तुम्ही अध्यक्ष असूनही माझ्या ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .

दळवी[/caption]
खूप दिवसांनंतर तुम्हाला पत्र लिहिण्याचा योग येतो आहे, याचा मनापासून आनंद वाटत आहे. मध्यंतरी बरेच महिने मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटू शकलो नाही, किंवा पत्रही लिहू शकलो नाही. त्याबद्दल क्षमा असावी. मला तुम्हाला भेटता आले नाही याचे मुख्य कारण जवळजवळ गेले वर्षभर एका नवीन कादंबरीच्या लेखनात गुंतलो होतो. गेल्या वर्षी परीक्षक समितीचे तुम्ही अध्यक्ष असूनही माझ्या ...


















MilindKelkar
7 वर्षांपूर्वीअख्खा अलाणे फळाणे, ठणठणपाळ आणि विनंती विशेष इथे प्रसिद्ध व्हावा ही इच्छा आहे. आधी वाचूनही हा विनोद प्रत्येक ओळीला हसवतो!
CDKavathekar
7 वर्षांपूर्वीमजा आली.आपण पण whisky दळवींचे बरोबरपितोय असा अनुभव आला.
asmitaph
7 वर्षांपूर्वीएकदम छान.
shaila
7 वर्षांपूर्वीखूप छान. वाचताना मजा आली.
manisha.kale
7 वर्षांपूर्वीमस्त !!!अतिशय खुसखुशीत लेख.