या वेळच्या 'अवांतर' मध्ये वाचा पत्रकार शुभदा चौकर यांनी 'वयम्' मासिकात संपादकीय म्हणून लिहिलेला आणि सोशल माध्यमातही बराच चर्चिला गेलेला लेख... 'वयम्’ मित्रांनो, आज जरा वेगळ्या विषयावर बोलायचंय तुमच्याशी. गेल्या महिन्यात यवतमाळला मराठी साहित्य संमेलन झाले. साहित्य संमेलन म्हणजे लेखक, कवी, त्यांचे चाहते (फॅन), वाचक या सर्वांचे वार्षिक स्नेहसंमेलन किंवा गॅदरिंग. यंदा या साहित्य संमेलनाच्या आधी फार मोठा वाद झाला. ९१ वर्षे वयाच्या प्रथितयश इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्यसंमेलनाचे उद्घाटन करायला बोलावले गेले होते. मात्र नंतर कुणा राजकीय पुढाऱ्याने धमकी दिली की, त्यांचे निमंत्रण रद्द करा. का, तर म्हणे त्या शासनाच्या विरोधात बोलतील. वेगळे विचार मांडणारे साहित्यिक नको होते त्यांना स्टेजवर. खूप भांडाभांडी झाली आयोजकांमध्ये. शेवटी नयनतारा सहगल यांना 'येऊ नका’ असे सांगितले आयोजकांनी. किती अनुचित घडले पाहा! फार नामुष्कीचा प्रसंग!! आपण एखाद्याला आपल्या वाढदिवसाला प्रेमाने बोलवावे आणि नंतर त्याला म्हणावे की 'तू येऊ नकोस माझ्याकडे..’ असे कधी करतो का आपण? या कृतीमुळे अनेक साहित्यिक भयंकर चिडले. अनेकांनी ठरवले की, अशा ठिकाणी आपण जायचे नाही. बहिष्कार घातला अनेकांनी. या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन झाले. डॉ. अरुणा ढेरे या संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या. अरुणाताई या अतिशय हुशार आणि विचारी साहित्यिक! त्यांचे विचार पक्के आहेत, त्यांची भाषा श्रीमंत आहे आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व संयमी, प्रगल्भ आहे. या सर्व गढूळ वातावरणात त्यांनी त्यांच्या विचारांची तुरटी फिरवली. दूषित करणारे घटक खाली बसवले आणि नितळ, निर्मळ वातावरणात पुढचे संमेलन पार पडले. चुकीचे वागलेल्यांना त्यांनी ठासून ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
aminchauhan
6 वर्षांपूर्वीमी सम्मेलनाला हजर होतो. तशी संमेलन अध्यक्षांची भाषण बोजड आणि रटाळ असतात. मात्र अरुणाताईचे श्रवणीय होते. ते वाचनीय करण्याचे मोठं काम शुभदा ताईंनी केलंय. हे भाषण लहान मुलांसोबतच मोठयांनीही वाचल्यास त्यांच्या मनापर्यंत ते पोचेल असं आहे. नायनतारांचा वाद मुलांच्या लक्षात आणून देण्याची त्यांची पध्द्त खूप भावली. खरं तर असे वाद मुलांपासून दूर ठेवण्यात अनेक लेखक धन्यता मानतील! पण शुभदाताईंनी हे कठीण काम लीलया पेललं आहे.
raginipant
6 वर्षांपूर्वीसुंदर,??
sanjaypethe
6 वर्षांपूर्वीडॉ. सौ. कुंदा देवल ह्यांच्या मेसेजचा, अरुणा ढेरेंवरील लेखाशी काय संबंध, ते कळलं नाही. ?
Apjavkhedkar
6 वर्षांपूर्वीनयनतारा यांना उघाटन करु दिले नाहि हेअत्यंत.लाजिरवाणे आहे. पणअरुणाबाइंी बाजु चोखपणे संभाळलि हे चांगले झाले. अनंत पद्माकर जवखेडकर
arya
6 वर्षांपूर्वीसहमत , लेखातल्या विचारांशी
SubhashNaik
6 वर्षांपूर्वीसुंदर विचार शुभदाने किती छान सोपे करून सांगितले आहेत मुलांना. मोठ्यांनीही यातून योग्य तो बोध घेतला पाहिजे. हिरा कोंदणात बसवावा तसं सुंदर भाषणाचं तितकंच सहजसुंदर विवेचन. आवडलं. - सुभाष नाईक, पुणे.