अंक – नवभारत, जानेवारी १९६८ शिवजन्माची तारीख १९ फेब्रुवारी १६३० का नाही याबद्दल नवभारताच्या नोव्हेंबर १९६७ च्या अंकात मी लेख लिहिला होता. त्याच विषयावर माझा एक लेख ऑक्टोबरच्या लोकसत्तेत प्रसिद्ध झाला. या लेखाला मुंबईचे डॉक्टर रवींद्र रामदास यांनी लोकसत्तेत आणि पुण्याचे श्री. ग. ह. खेर यांनी केसरीत लेख लिहून मी उपस्थित केलेल्या मुद्यांची चर्चा केली. त्यांचा अभ्यास करीत असता मी शहाजहानच्या चरित्राची, बादशहानाम्याची फारशी मुद्रीतप्रत मुंबई विद्यापीठातून मागविली. त्या प्रतीत दर्याखानाचे आणि शहाजीचे उल्लेख अनेक ठिकाणी आले आहेत. परमानंद वर्णन करतो ती दर्याखानावरची मोहीम १६२८ चीच. याबद्दल संशयाला काही जागा राहात नाही. पण १६३० च्या मोहिमेसंबंधी ज्या तारखा मी आपल्या लेखात दिल्या होत्या त्या श्री. बेंद्रे यांच्या ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’ या संशोधनात्मक ग्रंथातून घेतल्या होत्या. बादशहानाम्यावरून ताडून पाहता श्री. बेंद्रे यांनी दिलेल्या तारखात एक वर्षाची तफावत झालेली मला आढळली. उदाहरणार्थ शहाजी हा मोगल सुभेदार आजमखान याला मिळाला तो नोव्हेंबर १६३० मधे, १६२९ मधे नाही, दर्याखान मारला गेला तो जानेवारी १६३१ मधे, १६३० मधे नाही. अभ्यासकांचा गैरसमज होऊ नये म्हणून बादशहानाम्यातून तपासून घेतलेल्या तारखा पुढे देत आहे. ४ फेब्रुवारी १६२८ शहाजहान गादीवर येतो. २४ एप्रिल १६२८ खानजहान लोदी याची दक्षिणेच्या सुभेदाररीवरून माळव्यात बदली. दक्षिणच्या सुभेदारीवर नायब सुभेदार म्हणून खान जमान याची नेमणूक. मे १६२८ खान जमान याची बीडवर स्वारी. मे १६२८ शहाजीची खानदेशावर स्वारी, दर्याखानाकडून प्रतिकार. पंचवीस मे १६२८- आग्र्यात दर्याखानाला बादशहाकडून मन्सब मिळते. ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
deepa_ajay
6 वर्षांपूर्वीमला वाटत ज्या ना अजुन खुप उत्सुकता आहे त्यानी श्री नरहर कुरुंदकरांचे YoU Tube वरील भाषण 3 भागात आहे जरूर ऐकावे
deepa_ajay
6 वर्षांपूर्वीश्री नरहर कुरुंदकर यांचे अतिशय सुंदर भाषण U tube वर उपलब्ध आहे शिवाजी महाराजांची जन्म तारीख 1628 च सांगतात