मेतकुट जमलं !

पुनश्च    किरण भिडे    2018-07-04 06:00:38   

मेतकूट जीभेला चव आणतं. मेतकूट जमलं असं म्हणतात, तेव्हा दोन व्यक्तींच्या नातेसंबंधालाही चव आलेली असते. जगण्याला चव येते ती तुमचं स्वतःच्या जगण्याशी मेतकूट जमल्यावर. किरण भिडे यांच्या बाबतीत ते झालं आहे. आत्ता ठाणेकरांना ओळखीचे झालेले 'मेतकूट' आणि सवयीचे झालेले 'काठ आणि घाट', ही दोन्ही हॉटेल्स कशी सुरु झाली,  किरण भिडे नामक एक एमबीए व्हाया माधवबाग उकडीच्या मोदकापर्यंत कसा पोचला याची ही खमंग कथा- ******** ’’आई, अगं केवढ्या पुरणपोळ्या केल्या आहेस या ?अख्ख्या बिल्डिंगला वाटायच्यात की काय ?’’ ‘‘गप रे! समोरच्या मेनन काकूंकडे द्यायच्यात यातल्या दहा. त्यांचा मुलगा सूनपण येणारेत आज त्यांच्याकडे. उद्या चार शाळेत पण घेऊन जाईन. स्टाफरूममध्ये परवाच विचारत होते, भिडे मॅडम बर्‍याच दिवसात पुरणपोळ्या नाही खाल्ल्या तुमच्या हातच्या.‘‘ ‘‘आई अगं तुला लोक चढवतात हरभर्‍याच्या झाडावर आणि तू पण किलो किलोच्या पुरणपोळ्यांचा घाट घातलास  धन्य आहे तुझी.  आपल्या पुरत्या करायच्या तर.....’’ माझं वाक्य अर्ध तोडत, ’’असू दे रे. तेवढ्याच चार जणांच्या तोंडी लागतात.’’ असं म्हणून आईने विषय संपवला. आमच्या घरातील हा नेहमीचा संवाद. समोरची पार्टी मी, माझे बाबा किंवा माझा भाऊ अशी कोणीही. आणि आम्हांला खमकेपणाने पुरून उरणारी आमची आई. आई कुठलाही पदार्थ करणार म्हणजे दोन गोष्टी ठरलेल्या. एक तो उत्तमच होणार आणि दुसरी तो चार घरात वाटला जाणार. या वाटल्या जाण्यावरून आम्ही आईची कितीही चेष्टा केली तरी तिला त्याचा काहीही फरक पडायचा नाही आणि ती तिचं पदार्थ करण्याचं आणि वाटण्याचं काम पूर्वीच्याच जोमाने करत राहायची. या वाटण्यावरून मी तिला अनेकदा चिडवायचो ’’आई तू हॉटेलच का नाही काढत एखादं? भरपूर जणांना ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , सशुल्क , किरण भिडे , अनुभव

प्रतिक्रिया

  1. vidyakale

      7 वर्षांपूर्वी

    Khoop chhan …metkut cha amcha anubhavhi chhan aahe..thanyat aalo ke metkut tharlelach

  2. sakul

      7 वर्षांपूर्वी

    'मेतकूट'च्या निर्मितीची कथा छान सांगितलीय. फार छान वाटलं वाचून.

  3. rajashreejoshi

      7 वर्षांपूर्वी

    ठाण्यात आल्यावर अवश्य भेट देणार

  4. sujata17

      7 वर्षांपूर्वी

    मेतकूट छान खमंग जमलंय . एकदा खास मेतकूटला भेट देण्यासाठी ठाण्याला यायला हवं .

  5. lalita51

      7 वर्षांपूर्वी

    मी मेतकूटला अनेकदा भेट दिली आहे.दरवेळी तितकीच छान चव!लेख मस्त!

  6. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    आशा करूया लवकरच योग येईल...

  7. vyp13392

      7 वर्षांपूर्वी

    punyat metkut milnar ka?

  8. khadikarp

      7 वर्षांपूर्वी

    मेतकूटला कधी जाता येईल असे झाले आहे. मेतकूट च्या यशा बद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.

  9. Nandini

      7 वर्षांपूर्वी

    मेतकुटला कधी जाता येईल विचार चालु झाला .मस्त लेखन.महाराष्ट्रीयन पदार्थ बाहेर फार मिळत नाहीत. पदार्थात खुप वैविध्य आहे आशी खुप हाँटेल्स निघाली पाहिजे त

  10. Monika

      7 वर्षांपूर्वी

    मेटकूट च्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन ... बढ़ते रहो ...

  11. Manjiri

      7 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख उत्तम उपक्रम।

  12. asmitaph

      7 वर्षांपूर्वी

    छान लेख

  13. Parvani

      7 वर्षांपूर्वी

    खुपच छान जमलय मेतकूट

  14. anapatil

      7 वर्षांपूर्वी

    Metkutcha pravas aavdla ajun baryach thikani metkutcha chalu Hou de high sadichha

  15. vighneshjoshi

      7 वर्षांपूर्वी

    खरंच सुरू करा रे मेतकूट अजून 2 4 ठिकाणी

  16. शुभदा चौकर

      7 वर्षांपूर्वी

    एकदम रसरशीत लेख. आधी अंतर्नादमध्ये वाचला होता. तरी पुन्हा वाचायला मजा आली.

  17. Sanjaymanisha

      7 वर्षांपूर्वी

    Waaa...khup bharii.. माझा पुतण्या ने सुद्धा काहीतरी वेगळे कार्याचे म्हणून फिल्म प्रोडूकशन करत असताना आपटे रोड ला " ग्रीन सिग्नल " हे हॉटेल सुरु केले आहे ,कधीतरी जमल्यास भेट दया . रणजित गुगळे ९८२२११४४८८. -- संजय गुगळे अहमदनगर

  18. shubhadabodas

      7 वर्षांपूर्वी

    आमचा मेतकूट snacks चा अनुभव छान होता. थाळी ,झेपेल असे वाटत नाही.

  19. justtypeashu

      7 वर्षांपूर्वी

    मस्त एकदम मस्त, मराठी पाउल पडते पुढे, आमच्या पुण्यात पण शाखा चालू करा ना

  20. srija

      7 वर्षांपूर्वी

    वाचुन नक्कीच भेंट द्याविशी वाटतेय, आणि देणारच. ‘मेतूकूट’ साठी भरपूर शुभेच्छा. मुंबई मध्ये अधिकाधिक शाखा करण्यासाठी भर द्यावा. ??

  21. ab

      7 वर्षांपूर्वी

    अप्रतिम. छान.

  22. varshagokhale

      7 वर्षांपूर्वी

    खूपच छान! हल्ली एखाद्या गोष्टीचे क्रेडिट त्या त्या माणसाला देणे हा स्वभाव दुर्मिळ होत आहे, त्यात हा खरेखुरे अनुभव तसेच खरेखरे लिहिण्याचा प्रामाणिकपणा मनाला भावला!

  23. asiatic

      7 वर्षांपूर्वी

    मस्त आहे. खूपजणांना प्रेरणा देणारा आहे.

  24. asiatic

      7 वर्षांपूर्वी

    वा! मस्तच आहे या मेतकुटाची रेसिपी.

  25. Jitugholap

      7 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख सर, मेतकूट चा प्रवास वाचून खूप मोटिवेशन मिळालं, लगे रहो

  26. sugandhadeodhar

      7 वर्षांपूर्वी

    चविष्ट!! आमच्या बोरिवलीतही शाखा ये ऊदे!

  27. ab

      7 वर्षांपूर्वी

    'मेतकूट' हे नावंच छान आहे.लेख ही उत्तम .तिकडे जाणाऱ्या खवैयांच्या अपेक्षा पूर्ण होतातच आणि हॉटेलशी मेतकूट जमतेच !!! तुम्हाला भरपूर शुभेच्छा !!

  28. shubhada.bapat

      7 वर्षांपूर्वी

    मस्त. पोट भरलं

  29. smanisha

      7 वर्षांपूर्वी

    Visited this hotel, great food ?

  30. Seema1984

      7 वर्षांपूर्वी

    लेख खूप छान. मे तकू ट नाव आवडलं

  31. Makarand

      7 वर्षांपूर्वी

    मस्त. मेतकूट जमत असताना केलेल्या चर्चा आणि वाद विवाद आठवले. एका उत्तम निर्मितीत आपलाही सहभाग होता याचे समाधान मला मेतकूट विषयी इतर लोक कौतुकाने बोलतात तेंव्हा नेहमी मिळते.

  32. mahendranene

      7 वर्षांपूर्वी

    मेतकूट ची जन्मकथा खूपच रंजक वाटली आणि ' मेतकूट ' मधील मिळणाऱ्या " पुरण पोळी " इतकी आवडली. अस्सल महाराष्ट्रीयन थाळी व नाश्त्याच्या विविध पदार्थांचे (टिपिकल मिसळ,उपमा,पोहे,वडा सोडून) पर्याय देणारे ' मेतकूट ' अल्पावधीतच ठाण्याचा एक " मानबिंदू " ठरले आहे याचा आम्हांस एक ठाणेकर म्हणून देखील रास्त अभिमान आहे. असाच " खाद्यानंद " सर्वांना देत रहा .पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  33. gondyaaalare

      7 वर्षांपूर्वी

    ‘ मेतकूट ‘ ची जन्मकथा simply gr8 ! गिरगावातला मराठी माणूस उपनगरात जायला सुरुवात झाली आणि त्याचा थेट संबंध पूर्वीची नामांकित , मराठी पदार्थाची खासियत असणारी , उपाहारगृहे बंद पडण्यात झाला . अशा परिस्थितीत मोठ्या नेटाने तुम्ही , तुमच्या कुटुंबाने आणि मित्र परिवाराने सर्व अडचणी पार करुन यशस्वी केलेल्या ह्या उपक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन ! मराठी माणसाचेच पाय ओढणार्यानी एकदा कौतुकाचीही टाळी वाजवावी .



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts