जानव्याचा गुंता सुटला!

पुनश्च    दि. वा. साने    2019-03-06 06:00:56   

१९९५ साली मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ब्राह्मण मुख्यमंत्री हा नियम सिद्ध करणारा अपवाद असेल असे म्हटले गेले होते परंतु २०१४ साली फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा तो अपवादच आता पुढे नियम होऊ शकतो हे लक्षात आले. त्यानंतरच्या काळात देशभरातच राजकीय घुसळण झाली आणि ती सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर हा लेख देत आहोत. १९९५ साली जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा राजकारणातील ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यांचे विवेचन करणारा  दि. वा. साने यांचा हा  लेख किर्लोस्करमध्ये आला होता. तो मूळ इंट्रोसह- अंक-किर्लोस्कर – ऑगस्ट, १९९५ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एक ब्राह्मण आल्याने ब्राह्मणांना आनंद होताना दिसत आहे. त्याचे कारण काय असावे? या घटनेमुळे ब्राह्मणांना एक राजकीय गुंता सुटल्यासारखे वाटते आहे. तो गुंता म्हणजे राजकारणात ब्राह्मणांना स्थान नसणे. राजकीय गुंता सुटला. आता ब्राह्मणी मानसिकतेचे इतर गुंते सुटण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे लेखकाला वाटते. कोणते आहेत ते गुंते? एक ‘नाजूक’ विषयाची उघडपणे चर्चा करणारा हा लेख कोणतीही जातीय भावना उद्दिपीत करण्यासाठी लेखकाने लिहिलेला नाही किंवा संपादकांनी तो प्रसिद्ध केलेला नाही. तर या लेखातील विचारांची अधिक खुलेपणाने चर्चा व्हावी हाच उद्देश यामागे आहे. वाचकांनी या विषयावरील आपलेही विचार अवश्य कळवावे. योग्य त्या विचारांना प्रसिद्धी देण्यात येईल. कोणत्याही जाती-जमातीची वा व्यक्तीची निंदा नालस्ती करणारे द्वेषमूलक लिखाण प्रसिद्ध केले जाणार नाही. -    संपादक ( किर्लोस्कर- ह. मो. मराठे ) १९९५  ................................................................................................ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , राजकारण

प्रतिक्रिया

  1.   5 वर्षांपूर्वी

    हा लेख बहुविध अँप वर मिळून येत नाही आहे. वर दिलेल्या फेसबुक व गुगल च्या लिंक error दाखवित आहेत.

  2. deepa_ajay

      6 वर्षांपूर्वी

    मला वाटत श्री मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होणे आणि श्री फडणवीस मुख्यमंत्री होणे ह्यात मूलतः फरक आहे ,



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts