यात्रा पुढे सरकताना !


अंक- अंतर्नाद दिवाळी २०१५ लेखाबद्दल थोडेसे : साहित्य माणसाच्या जगण्यात आणि जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात असतं. साहित्यिक म्हणून मध्यमवर्गीय आयुष्य आणि 'व्हाईट कॉलर जॉब' करणारेच बहुसंख्य होते आणि आहेतही. तसं असणं हा काही कमीपणा नाही, परंतु एकाच वर्गातील लोकांच्या साहित्यामुळे साहित्यात तोचतोपणा येण्याची शक्यता मात्र असते. याला छेद देणारे अनेक प्रयोग मराठीत झालेले आहेत. न्हाव्याचा व्यवसाय करणारे राम नगरकर यांनी लिहिलेले 'रामनगरी', सीताराम मेणजोगे यांनी लिहिलेले 'पोस्टातली माणसे' किंवा डॉ रवी बापट यांचे 'केइएम वॉर्ड नंबर ५' या पुस्तकांनी मराठी साहित्याला वैविध्य दिले. प्रस्तुतचा लेख त्याच पद्धतीचा आहे. रेल्वेचा प्रवास आपल्या सर्वांना प्रसंगपरत्वे करावाच लागतो आणि दीर्घ रेल्वे प्रवास, त्यात भेटणारे सहप्रवासी यांची अनेक वर्णने साहित्यात आढळतात. परंतु मोटरमनला रेल्वे जशी आणि जेवढी समजते तशी ती कोणालाच समजणे शक्य नाही. मोटरमन हा आपल्याला केवळ यंत्रवत चालक वाटत असतो. बसला आणि चालवली गाडी, त्यात काय? परंतु संपूर्ण रेल्वेचंच अंतरंग उलगडून दाखवणारा आणि मोटरमनकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आरपार बदलवून टाकणारा हा लेख  खुद्द  ट्रेनचे सारथ्य करणाऱ्या गणेश मनोहर कुलकर्णी यांनी लिहिलेला आहे. खरे तर या लेखात एक पुस्तक दडलेले आहे- माझी नोकरी, त्यातले ताणतणाव हे सर्व एव्हाना घरातल्या सर्वांना सवयीचं झालं आहे. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशीच परिस्थिती आहे.ब-याचदा मी चंदिगड-बांद्रा ही गाडी चालवतो. रात्री दीड वाजता वेळेवर अहमदाबाद सोडल्यावर, सुरतनंतर सरळ बोरिवलीलाच त्या गाडीचा थांबा. सुरतला येता-येताच गाडीला खूपदा २०-२५ मिनिटं उशीर होतो. गाडीला

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , दीर्घा , अनुभव कथन
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Jitendra Dorle

      4 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लिहिलंय... खुपच छान माहितीपुर्ण मोटारमन चा जीवनपट शब्दात ऊभा केला आहे.. 👌👌 Hats off to Sh Ganesh Kulkarni🙏🙏

  2. निशिकांत tendulkar

      5 वर्षांपूर्वी

    माझे वडील रेल्वेत तिकिट तपासनीस होते.त्यांच्यासोबत आणि नंतर कामानिमित्त भरपूर रेल्वेप्रवास झाला. लेख वाचताना मज्जा वाटली. आठवणींचे अनेक तुटक दुवे जुळले.इंजीनमधुन प्रवास केल्यासारखे वाटले. आभार!

  3. Sudhir Dhone

      5 वर्षांपूर्वी

    " Pan rojchyaa jaganyaatalya chhotya-chhotya goshti saatvikpane kartaanaach tumcha khara kas laagato" --- Wonderful. " Gati-Pratibandh" very appropriate Marathi alternative. Very enriching experience.

  4. Kuldeep Ghorpade

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख आहे.

  5. Shriniwas Lakhpati

      5 वर्षांपूर्वी

    खुप-छान-भाष्य ! हा लेख वाचताना आपणही त्या गणेश कुलकर्णी ह्यांच्यासोबत रेल्वेच्या केबिनमधून प्रवास करतोय असं वाटलं. रेल्वेविषयीचीच्या ह्या लेखांचे एक छानसं पुस्तक नक्की होईल. हार्दिक-शुभेच्छा ! -- श्रीनिवास-लखपती-पनवेल.

  6. Shriniwas Lakhpati

      5 वर्षांपूर्वी

    खुप-छान-भाष्य ! हा लेख वाचताना आपणही त्या गणेश कुलकर्णी ह्यांच्यासोबत रेल्वेच्या केबिनमधून प्रवास करतोय असं वाटलं. रेल्वेविषयीचीच्या ह्या लेखांचे एक छानसं पुस्तक नक्की होईल. हार्दिक-शुभेच्छा ! -- श्रीनिवास-लखपती-पनवेल.

  7. Varsha Sidhaye

      5 वर्षांपूर्वी

    यांच्या लेखाचे एक मस्त पुस्तक होईल. डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग च्या फिल्ड वर अनुभवांची पुस्तके आहेत पण या विषयावर यांनीच पहिल्यांदा लिहिले । कवी मनाचे असल्याचे तसेच साहित्याची आवड असलेली पदोपदी जाणवत राहते

  8. Varsha Sidhaye

      5 वर्षांपूर्वी

    यांच्या लेखाचे एक मस्त पुस्तक होईल. डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग च्या फिल्ड वर अनुभवांची पुस्तके आहेत पण या विषयावर यांनीच पहिल्यांदा लिहिले । कवी मनाचे असल्याचे तसेच साहित्याची आवड असलेली पदोपदी जाणवत राहते

  9. sidhayevarsha277@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    किती जबरदस्त लेख! इंजिन मध्ये टॉयलेट ची सोय का बरं करत नाहीत ? एखादा संवेदनशील मनाचा माणूस रेल्वे सारख्या रुक्ष विभागात काम करून ते विश्व आपल्यासमोर मांडतो हेच आपले खूप भाग्य आहे ! त्यांचे antarnad मधील एकूण एक लेख मस्तच आहेत

  10. CDKavathekar

      7 वर्षांपूर्वी

    एखादं सुंदर गाणं ऐकत असल्याचा भास होत होता .

  11. ajitpatankar

      7 वर्षांपूर्वी

    लेख वाचून थक्क झालो. रेल्वे कर्मचारी कुठच्या कठीन परिस्थितीत काम करतात हे “जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे” अनेक गोष्टींची आपण कल्पनाही केलेली नसते. BBC आणि National Geographic यांनी भारतीय रेल्वेवर माहितीपट बनविले आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेनवर देखील माहितीपट आहे. त्याच्या link खाली देत आहे. https://www.youtube.com/watch?v=PM8kbyaa8sA https://www.youtube.com/watch?v=9ZgjglPEYrU यामुळे रेल्वेच्या या अवाढव्य कारभाराची ब-यापैकी कल्पना आली. एक मात्र झाले की रेल्वेची अनियमितता किंवा गाड्या बंद पडणे-विशेषत: पावसाळ्यात- अशा कुठच्याही गोष्टीसाठी रेल्वेला दोष देणे बंद केले. अपुरे मनुष्यबळ आणि साधनांची कमतरता असताना देखील रेल्वेचा कारभार उत्तम प्रकारे चालू आहे याचे कौतुकच आहे. हीच गोष्ट BEST ला सुद्धा लागू होते.

  12. Ajitdixit

      7 वर्षांपूर्वी

    Excellent Very very good



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts