माझी पहिली कथा

पुनश्च    दि. बा. मोकाशी    2019-04-03 06:00:42   

कथा, कादंबरी, प्रवासवर्णन असे विविध प्रकार दि.बा. उर्फ दिगंबर बाळकृष्ण मोकाशी यांनी हाताळले.  जेमतेम शिक्षण झाल्यावर टाकलेले रेडिओ दुरुस्तीचे दुकान आणि त्यानंतरचा प्रथितयश लेखक म्हणून झालेला प्रवास अशी मोकाशींची दोन अंगे आहेत. 'देव चालले', 'आनंद ओवरी' या त्यांच्या कादंबऱ्या आजही त्यांच्या शैलीतील वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय आहेत. साधी, प्रसन्न निवेदन शैली आणि प्रवाही संवाद ही त्यांची खासियत होती. १९४०च्या सुमारास त्यांनी कथालेखनाला प्रारंभ केला. गोष्ट लिहिण्याचा त्यांचा ध्यास आणि त्यासाठीचा पहिला प्रयत्न याची गंमतीदार हकीकत त्यांनी ललितच्या अंकात १९७५ साली लिहिली होती. ती वाचतानाही त्यांच्या नेहमीच्या शैलीचा अनुभव येतो. पुनश्च चा आजचा हा लेख आपण ऐकूही शकता. आगगाडीचा खड्खड् आवाज संथ येत होता. रात्र होती. बाहेर चांदणे होते. मी खिडकीतून चांदण्यात डुबलेले जग बघत होतो. माझ्या मनात येत होतं कविता करणं किंवा कथा लिहिणं किती सोपं आहे. ‘पडले होते रम्य चांदणे’ अशी काव्याला सुरवात करता येईल किंवा ‘चांदण्यातून गाडी धावत होती’ अशी कथेची सुरवात करता येईल. या दोहोंपैकी म्हणाल ते रचता येईल. पण ‘म्हणाल ते रचता येईल’ म्हणत असता पहिल्या ओळीच्या किंवा पहिल्या कडव्याच्या पुढे मला रचा येत नव्हतं. माझ्या ते लक्षात आलं नाही. कथा-कविता करणं सोपं आहे. अगदी फालतू काम आहे. खरं कठीण म्हणजे मोठे निबंधवजा पुस्तक लिहिणं. एखाद गंभीर विषय घेऊन ग्रंथ तयार करणं. लिहिलं तर तसं लिहावं. भुक्कड लिहिण्यात अर्थ नाही. असे तेव्हा माझे विचार होते. त्या वेळी मी सोळाएक वर्षांचा होतो. मी कथा किंवा कविता लिहून पाहिली नव्हती. गं

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभवकथन , ललित , पुनश्च , दि. बा. मोकाशी

प्रतिक्रिया

  1. Viraj Londhe

      4 वर्षांपूर्वी

    ही कथा ऐकायला खूपच छान वाटलं, तुमच्या ह्या उपक्रमाचे कौतुक व विनंती आणखी लेख ऐकता येतील असे काही करा जेणे करून माझ्यासारख्या वाचण्या पेक्षा ऐकण्या वर प्रेम असणार्‍या वाचकाना अधिक आनंद मिळेल. त्यासाठी अधिक शुल्क आकारले तरीही आवडेल.

  2. Ajitdixit

      6 वर्षांपूर्वी

    Very good.

  3. manisha.kale

      6 वर्षांपूर्वी

    गोष्टीची जन्मकथा आवडली. पैज लावून कथा लिहणे खूपच धाडसी पाऊल. लेखकाचे लहानपणीचे भावविश्व या लेखातुन समोर उभे राहिले. मस्त.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts