माझा सायकल प्रवास- भाग २

पुनश्च    सुमुख जोशी    2019-03-18 19:00:23   

चला तर मग पहीला भाग वाचल्यावर आपण निश्चित केल असेल की कुठली सायकल घ्यावी. किंवा घ्यावी की न घ्यावी. तेव्हा आपण आता पुढील भागात वळूया ज्यात मी माझे काही सायकल विषयीचे अनुभव शेअर करणार आहे. सायकल जेव्हा घेतली त्यानंतर सुरुवात झाली ती म्हणजे ठाण्यातल्या ठाण्यात फिरण्याची. म्हणजे ठाण्याच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे किंवा मग सिटी राईड. मग मनात विचार येउ लागले की आपण थोड लांब जावून बघाव. मग सुरुवात झाली मुलुंड पर्यंतच्या प्रवासाची. पहील्यांदा जेव्हा मुलुंडला हायवे वरुन टोल क्रॉसकरुन पुढे गेलो तेव्हा जवळ जवळ एखादा मोठा गड किंवा किल्ला सर केल्याची भावना मनात आली. परंतू लवकरच कळल की हे तर सगळेच करतात, मग एरोली भांडूप अगदी कांजूर किंवा विक्रोळी पर्यंत मजल मारली. हळूहळू स्वत:चा व्हिल्स ॲंड पेडल्स नावाचा ग्रूप सुरु केला आणि २०-२५ सभासदही केले. त्यातले बरेचसे फक्त whats app member म्हणून राहीले आणि बरेच सायकलिंगला येउनही गेले. पण जास्तीत जास्त ४-५ सभासदच एका राइडला बरोबर असायचे. ग्रूपला घेउन जाण्याचा आनंद वेगळाच होता पण खरी गंमत पुढे आली. पवई गार्डन राईड:- असाच ग्रूप ठरवून ५ जण आम्ही पवईला जायचे ठरवले. सगळ्यांकडे तशा गिअरच्या सायकली होत्या. आम्ही सहा वाजता सकाळी सुरुवात केली हवा छान होती पावसाळ्याचा ऋतू असल्यामुळे हवेत गारवा होता. मध्येच थोडे थोडे थेंब अंगावर पडत होते. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा खूपच छान सुरुवात झाली होती. पण आमच्यातला एक सभासद हा पूर्णपणे नविन होता त्याची सायकल पण बेसीक होती, गिअर होते पण तेही बेसीक. सुरुवात त्याने पण खूप छान केली परंतू कांजूरला पोहचल्यावर त्याची सायकल त्याला रंग दाखवायला लागली. २ वेळा चेन सुटली ब्रेक तुटला आणि एक असा क् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सुमुख जोशी , अवांतर , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. avinashbhegade

      6 वर्षांपूर्वी

    सायकल वर सगळीकडे फीरण्याचा आनंद काही औरच आहे... असेच छोटे मोठे लक्ष ठेऊन केलेली रायडींग आत्मविश्वास वाढवते...

  2. rambhide

      6 वर्षांपूर्वी

    लेख ओघवता आहे. सायकलिंग गृप लीड करताना मेंबर्सची पूर्वतयारी आगाऊ आजमावलेली असणे अत्यावश्यक असते. त्यासाठी उदा. १५ किमी २५ किमी व ४० किमीचे पल्ले तुमच्या बरोबर एकामागून एक सर केलेल्यांनाच ७० किमी च्या गटात सामिल करायचे असे काही prerequsits टाकणे गरजेचे असते.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts