काळ बदलला की कविता बदलते, बदलायला हवीच. कवितेला छंदाच्या बेडीतून मुक्ती मिळाल्यावर कवितांचे अमाप पीक आले आणि येतंही आहे. त्यामुळेच या साहित्य प्रकाराच्या पोटात दडलेल्या अभिव्यक्तिच्या अनंत शक्यताही समोर येत आहेत. छंदबद्ध, अलंकारिक, मुक्त कविता, गझल, हायकू, चारोळ्या असे सर्वच प्रकार एकाचवेळी आपापल्या परीने प्रकट होत राहिले तर ते चांगलेच आहे. कविता करण्याचं वय साधारणतः विशीच्या आसपास सुरु होतं, त्यामुळे विशीतल्या कवितांना कोवळेपणाचा एक गंध असतो. या कोवळेपणावर अनुभवाची पुटे चढून तिला अभिव्यक्तीची, शैलीची चौकट प्राप्त होण्याआधी ती अस्सल स्वरूपात असते. अशाच प्रकारच्या या तीन कविता. धीटपणे व्यक्त होणाऱ्या. आजचं जग, आजची भाषा आणि आजचे अनुभव सांगणाऱ्या- तू लिहिलीस- कवयित्री- योजना यादव, पुणे तू पावलांवर रोमांचांची व्याख्या लिहिलीस अन् देहावर प्रेमाचं महाकाव्य दाखवून दिलंस माझं अंतर्बाह्य बाई असणं योनीच्या पाकळ्यांना उमगले तेव्हा ऊब आणि दाहकतेचे अर्थ अन् स्तनाग्रावर थरथरली मैथुनाची हजार आसनं देह झाला पूर्ण रोमांग संपूर्ण रोमांग... रोमांग... असं वितळत गेलं अंतरंग निचरा होत गेला तृष्णेचा व्यासंग मान्सूनच्या पहिल्या धारेसारखा उतरत गेलास तू मुरवत गेलास परम आनंद उगमाच्या स्रोतावर ओंजळ घेऊन उभा राहिलास तू आणि दाखवून दिलंस अस्साही असू शकतो पुरुष. ***** तुझ्या मेसेजेसचे हत्ती कवी- सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत आयुष्याच्या निर्जीव गढीतून मी लावून बसलो होतो एक उदासीन थंड नजर मोबाइलच्या दिंडी दरवाज्य ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीमला मराठी नवकविता कळत नाहीत असा मलाच संशय होता... वरील कविता वाचल्यावर तो पक्का झाला....