नामदार गोखले हे अगदी काटेकोरपणे शिष्टाचार पाळणारे होते. त्यांनी टिळकांकडे निरोप धाडला की मला तुमच्याकडे येऊन भेटावयाचे आहे. गोखले यांच्या अशक्तपणामुळे जिना चढणे त्यांना कठीण झाले असते म्हणून गायकवाड वाड्यात शिरताना उजव्या हाताला पूर्वी प्रूफ करेक्टर (मुद्रितसंशोधक) बसण्याची खोली होती तेथे ही भेट घेण्याचे ठरले. तेथे दुसरे कोणी नसावे आणि राजकारणाची काही चर्चा होऊ नये असाही संकेत ठरला होता. मी त्यावेळी सतरा वर्षांचा आणि लो. टिळकांचे धाकटे चिरंजीव श्रीधरपंत हे एकोणीस वर्षांचे होते. आम्ही दोघांनी ह्या थोर पुढाऱ्यांची गुपचुपपणे भेट पाहता यावी यासाठी एक युक्ती केली. त्यावेळच्या जुन्या वाड्यात त्या खोलीच्या दुसऱ्या अंगाला एक सहाफुटी भिंत होती. तीत दोन्ही बाजूंनी फडताळे असलेले एक आरपार कपाट होते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .