अंक – आलमगीर, दिपावली १९६०
रँग्लर परांजपे यांची कन्या आणि लेखिका- दिग्दर्शिका सई परांजपे यांची आई, म्हणजे शकुंतला परांजपे. ही झाली निव्वळ विद्वत्तेची परंपरा सांगणारी नातेसंबंधांची ओळख. शकुंतला परांजपे यांनी समाजसेवेचा, ज्ञानाचा आणि साहित्याचा वारसा वडिलांकडून घेतला आणि पुढील पिढीकडे तो सुपूर्द केला. संतती नियमनाच्या प्रचारकार्यात स्वत:ला झोकून देणाऱ्या शकुंतलाबाईंचा जन्म पुण्यात १७ जानेवारी १९०६ रोजी झाला. विवेकबुध्दीला पटतं तेच करावं, ही त्यांच्या घरातली शिकवण होती. संतती नियमनाबद्दल जागृती नसतानाच्या काळात त्यांनी प्रचाराचे कार्याला वाहून घेतले. ‘समाज स्वास्थ्य’ या मासिकातून त्यांनी या विषयावर बरेच लेखन केले. १९६४ ते १९७० या काळात त्यांची राज्यसभेवर नेमणूक झाली होती. ‘घरचा मालक’ ही कादंबरी, ‘संगीत पांघरलेली कातडी’, ‘सोयरीक व लागेबांधे’ ही रूपांतरे ‘काही आंबट काही गोड’, ‘भिल्लीणीची बोरे’, ‘माझी प्रेतयात्रा’ असे ललित लेखन त्यांनी केले. ‘पाळणा लांबवायचा की थांबवायचा’ हे कुटुंबनियोजन विषयक पुस्तक त्यांनी लिहिले. खुसखुशीत नर्म विनोदी शैलीत त्या लिखाण करत. वैताग आल्यावर स्वतःलाच गाढव म्हणून घेण्याची, स्वतःलाच बोल लावण्याची एक सवय रँग्लर परांजप्यांना होती,शकुंतला परांजपे यांनाही ती लागली आणि संतती नियमनाच्या प्रसारात वेगळ्याच प्रकारे ही सवय त्यांना सहायभूत ठरली. या सवयीचा झालेला उपयोग आणि त्रासही परांजपे यांनी १९६० साली, आलमगीरच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या या लेखात गंमतीदार आणि नाट्यपूर्ण भाषेत सांगितला आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Varsha Sidhaye
4 वर्षांपूर्वीत्यांची बाकीची पुस्तके ही अशीच आहेत मस्त !
Prathamesh Kale
4 वर्षांपूर्वीखुपच कार्य कार्यश्रम होती पिढी.
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीवेगळीच माणसं होती हि. खरंतर अशा प्रामाणिक व जगावेगळ्या लोकांमुळेच देश चालतो आहे.
Parag Punekar
4 वर्षांपूर्वीअसाही काळ होता आणि तळमळीने सांगणारे सुध्दा होते...अप्रतिम
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीलेख तर उत्तमच आहे,पण तो काल वेगळाच होता,आता कुणी ऐकूनच घेणार नाही,आता प्रत्येकालाच आपणच हुशार असल्याचा अहंभाव आहे ना,असो
Vandana
6 वर्षांपूर्वीअप्रतिम
CDKavathekar
6 वर्षांपूर्वीमाझ्या माहिती प्रमाणे अव्याहतपणे समाजाच्या भल्या साठी पिढ्यान पिढ्या झटणारी महाराष्ट्रातील कुटुंबे म्हणजे कर्वे व परांजपे .
rsrajurkar
6 वर्षांपूर्वीसमाजाच्या प्रगती साठी झटणाऱ्या शकुंतला ताई ग्रेट च.
MADHAVIMD
6 वर्षांपूर्वीपरांजपे घराणे काळाच्या पुढे होते. शकुंतला परांजपे चे कार्य तर अद्वितीय च! त्यांची लिखाणाची नर्म विनोदी शैली, चेहर्यावर स्मितहास्य निर्माण करते.प्रतिकूल परिस्थितीतही कार्य करतांना स्वतः वर विनोद करून ताणतणाव कमी होतो च.