मराठी रंगभूमीला साठच्या दशकात स्थैर्य प्राप्त करुन देणाऱ्या नाटककारांमध्ये प्रा. वसंत कानेटकर (२० मार्च १९२२- ३० जानेवारी २००१) हे प्रमुख नाव. ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘लेकुरे उदंड जाली’, ‘हिमालयाची सावली’, ‘मत्स्यगंधा’ अशी त्याची काही नाटके खूप लोकप्रिय झाली. ‘वेड्याचं घर उन्हात’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘मला काही सांगायचंय’ या नाटकांचं कौतुक झालं. मात्र ही सगळी नाटकं १९६०च्या नंतरची. १९५८ साली त्यांनी वास्तव आणि अद्भूताच्या पातळीवरचं ‘देवांचं मनोराज्य’ हे नाटक लिहिलं होतं, त्यावर मात्र अमाप टीका झाली. वाचकांनी पत्रे लिहून नाराजी व्यक्त केली. कथा, कादंबऱ्या वाचून कौतुक करणारे वाचक त्यांच्यावर तुटून पडले. तेंव्हा देवाचं अस्तित्व, नास्तिकत्व, देव ही संकल्पना, सर्वसामान्य माणसाच्या देवविषयक भावना या सगळ्याचा उहापोह करणारा एक सुंदर लेख त्यांनी लिहिला. १९६० साली वसंत मासिकात प्रसिद्ध झालेला तो लेख आजही तेवढाच प्रस्तुत, सुसंगत आणि आवश्यकही आहे- ............................................................................ अंकः वसंत, जुलै १९६० नवे पुस्तक प्रकाशित झालें की, अनेक वाचक मित्रांच्याकडून आपला अभिप्राय कळविणारी अनाहूत पत्रे लेखकाला येऊ लागतात. निदान माझा तरी हा नित्याचा अनुभव झाला आहे. हे अनोळखी पण उत्साही पत्रलेखक मोठे प्रांजळ आणि भाबडे रसिक असतात. त्यांच्याजवळ मुरब्बी टीकाकाराचे पांडित्य नसले तरी पूर्वग्रह आणि हेवेदावेहि नसतात. पुस्तक आवडले तर खुषींत ते लेखकाची पाठ थोपटतील. पण आवडले नाही तर रागारागानें पाठ सोलून काढण्यासहि ते कमी करणार नाहीत. ‘पंख’, ‘पोरका’, ‘वेड्याचं घर उन्हांत’ इ. पुस्तकांबद्दल मला भरपूर शाबासकी देणाऱ्या य ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
PramodVasantBapat
6 वर्षांपूर्वीकानेटकरांच्या प्रतिभेची रसवत्ता आणि विचारगर्भता अशा दोन्ही वैशिष्ट्यांचे सहज दर्शन घडविणारा हा तसा विस्मरणात गेलेला लेख कित्येक दशकांनी 'पुनश्च' वाचताना तो सशक्तसुंदर अनुभव मिळाला. आपल्या शोध आणि विचक्षण निवड या दोन्हीहीसाठी आपल्याला धन्यवाद !!