काँग्रेसचे घवघवीत यश...पण कधीचे?


अंक – आनंद, मार्च १९३७ लेखाबद्दल थोडेसे : 'भारत सरकार-कायदा १९३५' या अंतर्गत  ब्रिटिश भारतातील ११ प्रांतांमध्ये  १९३६-३७ साली प्रांतिक निवडणुका घेण्यात आल्या.  त्यात ८ राज्यांत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला तर बंगाल,पंजाब, सिंध या तीन प्रांतात काँग्रेसला अपयश आले. त्यावेळच्या निकालांचे विश्लेषण करणारा हा अप्रतिम लेख 'आनंद' या मासिकाच्या मार्च १९३७च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. गोपीनाथ तळवलकरांनी या लेखात केलेले कॉंग्रेसच्या यशाचे वर्णन वाचून आजच्या काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यांत अपयशाचे पाणी येईल आणि त्या काँग्रेसची जागा आता आपण घेतली आहे, या भावनेने भाजपचे पाठीराखे मात्र सुखावतील. तब्बल ८२ वर्षांपूर्वीचा हा लेख वाचताना खूपच मनोरंजन होते. 'हिंदी जनता व्यक्तीपेक्षां संस्थेला अधिक महत्त्व देण्याच्या मार्गांत आहे हे निःसंशय! अर्थात् व्यक्तिमाहात्म्य् अद्यापी कमी झालेले नाही आणि कायमचे कमी होणे तर केव्हांच शक्य नाही.' अशी वाक्ये वाचल्यावर लेखकाचे द्रष्टेपण जाणवते. पुढील आठ दशकांत देशाच्या विविध भागातील राजकारण कशी वाटावळणे घेत आजच्या स्थितीला येऊन पोचले याचाही अदमास आपल्याला येतो. देशाच्या राजकीय प्रवासाचा अभ्यास करण्यास अत्यंत उपयुक्त असलेला हा लेख आहे. गोपीनाथ तळवलकर हे तब्बल ३५ वर्षे आनंद या मासिकाचे संपादक होते. त्यांनी बरेच बालसाहित्य लिहिले. प्रख्यात पत्रकार, संपादक स्वर्गीय गोविंदराव तळवलकर यांचे ते चुलते. ********** निवडणुकी संपल्या; अर्थात् पक्षपक्षांतला प्रासंगिक लढाही संपला म्हणण्यास हरकत नाही. पावसाळी छत्र्यांप्रमाणमे निवडणुकीच्या हंगामांत उगवलेली आणि पक्षोपपक्ष्यांच्या खतपाण्यावर पोसलेली पत् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , इतिहास , राजकारण , आनंद

प्रतिक्रिया

  1. Parasharam Joshi

      4 वर्षांपूर्वी

    लेख अपूर्ण वाटतोय,मात्र लेख आवडला

  2. shripad

      5 वर्षांपूर्वी

    एका घराण्याच्या वळचणीला नेऊन बांधल्यामुळे एके काळी काँग्रेस असे यश मिळवत होती हे ही आता अविश्वसनीय झाले आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts