गाजर दाखवून एकेकाला कसं भूलवलं जातं आणि भले भले त्याला कसे भूलतात हे समजून घेण्यासाठी आपण आजच्या राजकीय घटनांकडे पाहिलं तरी पुरेसं ठरेल. मात्र हे जे ‘भले भले’ आहेत त्यांना गाढव म्हणायचं की शहाणं म्हणायचं ते काळच ठरवेल. तूर्तास आपण गाजर आणि गाढवाची एक फर्मास कथा वाचू या. या कथेतून काय अर्थ काढायचा, काय अर्थ निघतो ते ज्याचं त्यानं ठरवावं. ही कथा लिहिली आहे, प्रतिभा रानडे यांनी. त्यांची आपल्याला मुख्य ओळख आहे ती ‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’, ‘अफगाण डायरी’, ‘बुरख्याआडच्या स्त्रीया-काल आणि आज’ या पुस्तकांमुळे. अमृता प्रितम यांच्या ‘बंद दरवाजा’चा मराठी अनुवादही त्यांनी केला आहे. प्रस्तुतचा कथावजा ललित लेख त्यांनी १९७९ साली मे महिन्याच्या ‘स्त्री’ मासिकात लिहिला होता. मनुष्यप्रवृत्ती कधी बदलत नाहीत, त्यामुळे हा लेखही कायम ‘आजचा काळातला’ वाटत राहणार आहे. ********** अंक – स्त्री, मे १९७९ एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक गाढव राहायचं. आपण बरं, आपलं काम बरं अशा वृत्तीचं शहाणं गाढव होतं ते. कधी कुरकुर नाही, तक्रार नाही, धुसपूस नाही. की कधी आनंदानं वेळी अवेळी खिंकाळणं नाही, की कधी आपले चारी पाय हवेत नाचवत मातीमध्ये पाठीवर लोळणं नाही. तर, असं ते एक शहाणं गाढव होतं. आता तुम्ही म्हणाल, गाढवाच्या जन्माला येऊन अडेल तट्टूपणानं चालता चालता मध्येच थांबायचं नाही, दुगाण्या झाडायच्या नाहीत, की रात्र पडल्यावर आपल्या मालकाच्या दुष्टपणाबद्दल कुत्र्याशी बातचीत करायची नाही, की वेळी अवेळी खिंकाळायचं नाही की उकिरड्यावर लोळायचं नाही—हा म्हणजे शुद्ध गाढवपणाच झाला की! ते गाढव शहाणं वगैरे काही नसेल. त्याला स्वतःचं सुखदुःख कळतच नसेल म्हणून ते तसं शहाण्यासारख वागत असे ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीगोस्ट खान आहे . रूपकात्मक असत्या सारखी वाटते .
arush
6 वर्षांपूर्वीखूप वाइट वाटलं
bookworm
6 वर्षांपूर्वीवाचता वाचता अंतर्मुख करणारी गोष्ट आहे ही! गाढवाने डोळे फोडून घेतले ते गाजरामुळे नव्हे तर अतिरेकी हव्यासामुळे! कितीही गाजरे दाखवली तरी त्यामागे किती पळायचं व स्वत:ला गाढवाच्या श्रेणीत मोजायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं...
rambhide
6 वर्षांपूर्वीगाढवाला गाजराच्या प्रश्णाची "Gravity" कळती तर गाढव मागच्या पायावर माणसासारखे ताठ उभे राहते व गाजर त्याच्या तोंडात आपसुक येते. गाढवच ते!
purnanand
6 वर्षांपूर्वीवा ! खूप छान .बोधकथाच आहे ज्याचा त्याने ज्याला हव्या तशा संधार्भाने अर्थ काढावा.खूप सुंदर.