सद्य परिस्थितीमध्ये 'काश्मीर हे नक्की कोणाचे?' याबद्दल अनेकांना कुतुहल व औत्स्युक्य वाटत असेल. तर काश्मीर आहे काश्यप ऋषींचे. काश्मीर हे नाव आलेच मुळी काश्यपांपासुन. 'काश्यपः मीर' ! संस्कृत भाषेत मीर म्हणजे मोठे सरोवर. काश्यप हे सद्य वैवस्वत मन्वंतरातील सप्तॠषींपैकी एक. काश्यप गोत्री लोक ही काश्यपांची संतती आहे. प्रजापती दक्षांच्या तेरा कन्यांचा विवाह काश्यपांसोबत झाला होता. देवता, दानव, यक्ष व नाग हे सर्व काश्यपाचीच संतती आहेत. मेरू पर्वत रांगांमध्ये एक अतिशय विस्तृत व रमणीय सरोवर होते. भगवान शंकर व त्यांच्या अर्धांगिनी सती या दोघांनाही हे सरोवर अतिशय प्रिय असल्यामुळे, हे दोघेही या सरोवरावर नियमित येत असत. काश्यपांनी सतीला हे सरोवर आंदण दिले तेव्हापासुन या सरोवराला 'सतीसार' हे नाव पडले. जलोद्भव नावाच्या दुष्ट दैत्याने या सरोवराचा आश्रय घेऊन परिसरातील लोकांना त्रस्त करून टाकले होते. परिसरातील लोकांनी काश्यप ऋषींना जलोद्भवाच्या क्रौर्याची व आतंकाची माहिती देऊन त्यांना यातुन वाचवण्याची प्रार्थना केली. काश्यपांनी त्यांच्या नाग वंशीय 'अनंत नाग' नावाच्या मुलाला बोलावून जलोद्भवाचा आतंक संपवण्याची आज्ञा केली. त्यांनी सरोवरातील पाणी सोडुन देऊन सरोवर कोरडे करायचे व त्यामुळे उघड्यावर पडलेल्या जलोद्भव दैत्यास भगवान श्री विष्णूंच्या हातुन मारावयाची नीती आखली. याच नीतीनुसार सरोवराच्या पश्चिमेला 'वराहमुख' (सध्याचे बारामुल्ला) नावाची दरी (घाटी) खोदुन त्याद्वारे सरोवरातील सर्व जल सर्व बाजूंना जमिनीने वेढलेल्या सागरात वहावुन देण्यात आले. या सागराचे नाव होते 'काश्यप सागर' (सध्याचा कॅस्पियन सी). स्वतःचे जल संरक्षण नाहीसे झाल्याचे बघुन जलोद्भव दैत्य सरोवराबाहेर उघड्या ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, ललित
, स्थल लेख
, मुक्तस्त्रोत