स्वातंत्र्य मिळण्याच्या आणि सत्ता हस्तांतरणाच्या हालचाली दिल्लीत सुरू होत्या तेव्हा कलकत्त्यात हिंदू-मुस्लीम दंगली पेटल्या होत्या. त्या दंगली शांत करण्यासाठी महात्मा गांधींनी ७ नोव्हेंबर १९४६ ला नौखालीत पोचले. गांधीजींच्या व्यक्तिमत्वातील अनेक असामान्य पैलूंपैकी त्यांचे धैर्य ही एक अत्यंत महत्वाची बाब. गांधीजी नौखालीत असताना कर्नाटकमधील एक मराठी छायाचित्रकार-पत्रकार नारायणराव कुलकर्णी हे गांधीजींची छायाचित्रे आणि स्वाक्षरी मिळविण्यासाठी तिथे गेले होते. त्या दौऱ्याची तयारी, तपशील आणि गांधीजींसोबतचा अनुभव यावर आधारित हा लेख त्यांनी किर्लोस्कर मासिकाच्या एप्रिल १९४७ च्या अंकासाठी लिहिला होता. आज महात्मा गांधींची १५० वी जयंती आहे, त्या निमित्तानं ही उजळणी- महान कार्याच्या सिद्धीसाठी महात्मा गांधींची अभूतपूर्व पायी यात्रा गेल्या फेब्रुवारी महिन्यांत मला नौखालीला जाण्याची आणि गांधीजींची भेट घेण्याची महत्त्वाची संधी मिळाली. कर्नाटकांत प्रेस-फोटोग्राफर म्हणून काम करीत असतांना बहुतेक सगळ्या हिंदी पुढाऱ्यांचे फोटो व स्वाक्षऱ्या मी मिळविल्या आहेत; पण छायाचित्रांच्या या संग्रहांत अद्याप गांधीजींचा स्वाक्षरीयुक्त फोटो नव्हता. हा फोटो मिळविण्याकरिता गेल्या वर्षापासून मी प्रयत्न करीत होतो. त्यासाठी मी मुद्दाम मुंबईस भरलेल्या ए. आय्. सी. सी. च्या बैठकीला गेलो होतो. पण गांधीजी मुंबईस असूनही बैठकीच्या ठिकाणी आले नाहीत. कदाचित् गांधीजींची स्वारी मीरत काँग्रेसच्या अधिवेशनास येईल या आशेने मी मीरतलाही गेलो होतो; पण बंगाल सोडून ते आले नाहीत. शेवटी मीच नौखालीला जाण्याचे ठरविले. “सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः ” या न्यायाने प्रथम पैशाची व्यवस्था करणे भाग ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
benodekarabhinav@yahoo.com
5 वर्षांपूर्वीत्या काळातील अन प्रत्यक्ष गांधीजीबद्दल वाचण्यास मिळाले .फोटोग्राफीबरोबरच कुलकर्णीची माणसे ,निसर्ग यांची निरीक्षणे चांगली आहेत !
prashant1414joshi@gmail.com
6 वर्षांपूर्वीआईनस्टाईन म्हणाला होता गांधी यांच्या सारखा माणूस होऊन गेला हे पुढच्या पिढीतील लोकांना पटणार नाही, खर आहे .
bookworm
6 वर्षांपूर्वीऐतिहासिक लेख!अहंकाराचा लवलेश नसलेले असे गांधीजी म्हणजे जणु गन्गौघाचे पाणी !!
sanjiv chimbulkar
6 वर्षांपूर्वीसुंदर संकल्पना आणि भूतकाळाची पूनश्च अनुभुती