मराठी वृत्तपत्रसृष्टीत वृत्तपत्र व्यवसायाला शेठजींचा उद्योग असे म्हटले जाते आणि संपादकांना उपहासाने शेठजींची चाकरी करणारे पत्रकार असे म्हटले जाते. याचे कारण महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आणि लोकमत या तिन्ही प्रमुख मराठी वृत्तपत्रांचे मालक शेठजी म्हणजे मारवाडी आहेत. मराठी मालक असलेली सकाळ, पुढारी, गावकरी,नवाकाळ आणि इतर काही वृत्तपत्रे यशस्वी असली तरी या तीन प्रमुख वृत्तपत्रांचा दरारा आणि आर्थिक पसारा त्यांच्या तुलनेत खूप मोठा आहे. ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे आजचा लेख पूर्णाशांने पहिले भारतीय वृत्तपत्र असलेल्या मुंबई समाचार या वृतपत्राविषयी आहे. अतिशय रंजक माहिती आणि इतिहास सांगणारा वि. कृ. जोशी यांचा हा लेख ७२ वर्षांपूर्वीचा आहे. हे वृत्तपत्र सातत्याने प्रकाशित होत असल्याबद्दल या लेखात वृत्तपत्राचे कौतुक करण्यात आले आहे. त्यानंतरही या परंपरेत खंड पडलेला नसून गेली १९८ वर्षे हे वृत्तपत्र अविरत सुरु आहे. लवकरच ते २०० वे वर्ष साजरे करणार असून त्याचे सध्याचे संपादक आहेत निलेश दवे. अंक- मुंबई समाचार, एप्रिल १९४७ ********** आजकालच्या जुन्या वर्तमानपत्रांत सर्वात जुने वर्तमानपत्र कोणते असा अनेक वेळा प्रश्न केला जातो; पण ह्या प्रश्र्नास समर्पक असे उत्तर आतापावेतो कोणी दिल्याचे आढळत नाही. वर्तमानपत्रांची प्रथा हिंदुस्थानात प्रथम १७८० साली युरोपियनांनी सुरू केली, तेव्हापासून आतापर्यंत वृत्तपत्रसृष्टींत अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. सुरुवातीला, म्हणजे जवळ जवळ १८९० पावेतो वृत्तपत्रांना स्थिरता नव्हती असे आढळून येते. नवीन नवीन वर्तमानपत्रे निघावीत व एकदोन वर्षे, किंबहुना एक-दोन अंक निघावेत व त्यांचा अंत व्हावा अशी स्थिती चालू ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .