मोलकरीण - मध्यमवर्गीय दुखरा कोपरा

पुनश्च    लीला देवधर    2019-09-28 06:00:24   

मोलकरणी आणि त्यांच्या नाना तऱ्हा हा आजही सगळ्या मध्यमवर्गीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. काळ बदलला तशा मोलकरणी बदलल्या असं आपण म्हणतो तेंव्हा अलिकडेच टीव्हीवर झळकलेली एक जाहिरात सगळ्यांना आठवेल.  एक गृहिणी मोलकरणीला विचारते, ‘काय गं काल आली नाहीस आणि येणार नाही हे कळवलं सुद्धा नाहीस’. त्यावर ती (टंच) मोलकरीण टेचात सांगते, ‘मी येणार नसल्याचं काल फेसबुकवर टाकलं होतं आणि साहेबांनी ते लाईकसुद्धा केलं होतं!’ मोकरणी मॉडर्न होण्याची सुरुवात आणि त्या मॉडर्न झाल्याचा ताप पन्नास वर्षांहून अधिक जुना आहे हे १९६६ सालचा हा लेख वाचून लक्षात येते. अतिशय धमाल आणि फर्मास शैलीतील हा लेख वाचताना, पन्नास वर्षांपूर्वी आठ ते दहा रुपये महिना एवढ्या पगारात मोलकरणी मिळायच्या हे वाचून आणि आजचे दर आठवून जरासे चुकचुकायलाही होते. नर्म विनोद, उपहास, स्वतःवरच विनोद करण्यातली खुमारी हे सर्व काही या लेखात आहे- ********** अंक – वाङ्मय शोभा, एप्रिल १९६६ वास्तविक ह्या विषयावर आजपर्यंत बरीच लेखणी झिजली आहे म्हणजे प्रश्नांची! भांडी घासून आणि धुणं धुऊन दमलेले हात लिहिण्यासाठी निदान ह्या विषयावर तरी पुन्हा पुढे सरसावले हे तरी नवलच मी म्हणते. पोटतिडिक – खरं म्हणजे हाततिडिक – स्वस्थ बसू देत नाही. तसं पाहिलं तर ह्या विषयावर लिहून का हा प्रश्न सुटणार आहे? नाही! तरी आम्ही लिहितोच. त्याची अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे, मोलकरणी अजून लेख वाचायला लागल्या नाहीत. त्या रेडिओ सिलोन ऐकतात, संप करतात, पाच वारी पातळं नेसून, पोनी टेल घालून भांडी घासायला येतात! (उद्या एकादीनं हातात रिस्टवॉच घातलं तरी त्यात आश्चर्य नाही.) डोक्यात गजरे-वेण्या माळतात, (आम्हाला दोन चाफ्याची फुलं घ्यायची तरी चार प्रश्न पडत ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , ललित , वाङ्मय-शोभा

प्रतिक्रिया

  1. jasipra

      5 वर्षांपूर्वी

    तेव्हाचे 8-10 रूपये आजचे 3-4 हजार भाऊ .

  2. Meenalogale

      6 वर्षांपूर्वी

    छान लिहीले आहे.आता महिन्याला दोन सुट्ट्या आणि वॉशिंग मशीन नसेल तर कामवाली बाई मिळत नाहीं.एक गोष्ट मात्र मान्य करायला हवी कीं स्वस्तात सेवा मिळते म्हणून ती अजून परवडते आहे.माझ्या परदेशी स्थाईक मैत्रिणीला आईच्या इतकीच कामवाल्या बाईची आठवण येत असे.

  3. carvindan@yahoo.com

      6 वर्षांपूर्वी

    गमतीदार अनुभव! त्या काळात फेरफटका मारून आलेल्या सारखं वाटलं



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts