गोवा मुक्ती संग्रामाचे प्रतिक झालेले प्रखर देशभक्त मोहन रानडे यांचे अलिकडेच म्हणजे २५ जून २०१९ रोजी निधन झाले. शिक्षक म्हणून एकेकाळी त्यांनी गोव्यात केलेला प्रवेश आणि त्यांच्या कारवायांचा धसका घेऊन १९५५ साली त्यांना पोर्तुगीजांनी केलेली अटक हा एकेकाळी गाजलेला कालखंड. त्यांना पोर्तुगालमध्ये न्यायालयात हजर करुन २६ वर्षांची शिक्षा देण्यात आली. पुढे १९६९ साली त्यांची सुटका झाली तेंव्हा प्रचंड उत्साहाने त्यांचे भारतात स्वागत झाले होते. रानडे यांच्या मनात हा देशभक्तीचा पलिता अगदी पोरसवदा वयापासूनच पेटलेला होता. त्यांच्या सुटकेच्या दोन वर्ष आधी 'अमृत'मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख- ********** अंक – अमृत, ऑगस्ट १९६७ ‘मुलांनो, तुमच्या भावना व तुमच्या मनाची तळमळ मी जाणतो. पण तुम्हाला अजून वेळ आहे. परत घराकडे जा, शिकून मोठे व्हा, मग हे मायभूमीला स्वतंत्र करण्याचे व्रत घ्या’ अशा धीरोदात्त शब्दात बॅ. सावरकर यांनी चार मुलांना उपदेश केला. यापैकी एक होते, मोहन रानडे. बंगालमध्ये निरपराध हिंदूंची ते केवळ हिंदू आहेत, या कारणासाठी चालू असलेली हत्या पाहून अगदी पंधरासोळा वर्षांची मुले संतप्त झाली. अन्यायाचा प्रतिकार झालाच पाहिजे, आपण सर्वशक्तीनिशी तो नाहीसा केलाच पाहिजे. अन्यायाच्या प्रतिकाराची भावना जिवंत असेल तर ते राष्ट्र स्वतंत्र होऊ शकेल व स्वातंत्र्य टिकवू शकेल. अन्यायाच्या प्रतिकाराची भावना जिवंत असणे हेच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. म्हणून ही चार मुले मुंबईला सावरकरांकडे ‘आम्हाला बंगालमध्ये पाठवा’ असे सांगण्यासाठी गेली होती. सावरकरांनी त्यांच्या राष्ट्रप्रेमाचे, धर्मप्रेमाचे, अन्यायाचा प्रतिकार करण्याच्या भावनेचे मनापासून कौतुक केले. मोहन रानडे यांचे मूळचे ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, अमृत
, व्यक्ती विशेष
advshrikalantri@gmail.com
5 वर्षांपूर्वीChan . हुतात्मा मोहन रानडे यांचे कार्य आणि त्याग याचे पुनःस्मरण झाले. पोर्तुगीज कैदी आपण सोडले होते ,ते कोण होते ,हे समझत नाही.