लेखाचं शीर्षक तुम्हाला मध्यंतरी आलेल्या एका मराठी सिनेमाची आठवण करून देईल. पण खरंच मला हा प्रश्न पडला होता आपल्या मराठी माणसाच्या संदर्भात. निमित्त होतं मध्ये आम्ही केलेल्या एका मोठ्या प्रोजेक्टचं. काही महिन्यांपूर्वी आम्ही एका उपहारगृहाचं काम केलं. बऱ्यापैकी मोठा प्रोजेक्ट होता आणि खूप माणसांची गरज होती. एसीवाले, किचनवाले, सिविल काम करणारे, सुतार, इलेक्ट्रिशिअन, प्लंबर वगैरे. १०० हून जास्त लोकांनी त्या प्रोजेक्टवर काम केलं असेल पण सांगायला विषाद वाटतो की त्यातले १०-२० सुद्धा मराठी असतील नसतील. मालक नाही, व्यवस्थापक नाही, कामगार नाही. कुठच्याच पदावर मराठी माणूस दिसला नाही. आम्ही खूप प्रयत्न करून एसीवाला आणि इलेक्ट्रिशिअन मराठी शोधला.पण त्याच्या हाताखाली सगळे अमराठी कामगार. आमच्या हॉटेलमध्ये वेटर, कुक, कप्तान पदासाठी मराठी कामगार शोधताना आमच्या नाकीनऊ आले. तेव्हा मला प्रश्न पडला "सध्या मराठी माणूस करतो तरी काय?" परवा whatsapp वर आलेला लेख वाचून महाराष्ट्रातल्या गावांमध्ये काय चाललंय त्याचा थोडा उलगडा झाला पण शहरांमध्ये काय चाललंय हा प्रश्न बाकी आहेच ... पनवेलपासून ३०-३५ किमी अंतरावर सुमारे दीडशे एकर जागेवर एका मोठ्या बंगल्याच्या प्रोजेक्टवर मार्केटिंग सल्लागार म्हणून माझी नियुक्ती झाली. बिल्डरने मला साइटवर भेटायला बोलावले. कोणत्याही प्रोजेक्टचा मार्केटिंग सल्ला देण्याच्या अगोदर मी खूप सखोल अभ्यास करतो. प्रोजेक्टचे लोकेशन, आजूबाजूचे लोक, त्यांचे व्यवसाय, सामाजिक वातावरण, निसर्ग इत्यादी. हे सर्व माहीत होण्यासाठी मी स्थानिक लोकांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. बिल्डरच्या सहकार्याने गावातील व परिसरातील किमान पन्नास लोकांशी भेट घालून देण्याचे वचन दिले आणि माझे काम सुर ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
shripad
6 वर्षांपूर्वीइथे प्रतिक्रिया देण्यासाठी ईमोजी हवी, डोळ्यातून एक अश्रु काढणारी.