आपल्याकडे महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षांनी कितीही गर्जना केल्या तरी स्वबळावर सत्ता स्थापन करणे त्यांना कधीच जमू शकलेले नाही. बाळ ठाकरे किंवा शरद पवार यांना हिंदूहृदयसम्राट आणि जाणता राजा वगैरे अतिशयोक्त पदव्या दिल्याने त्यांच्या कर्तृत्वाच्या या मर्यादेकडे दुर्लक्ष करता येत नाही. या पार्श्वभूमीवर ममता बनर्जी असो वा जयललिता, वा मायावती किंवा चंद्राबाबू नायडू, नवीन पटनायक, मुलायमसिंग, लालूप्रसाद यादव असे अनेक प्रादेशिक नेते उठून दिसतात. त्यांचा आपापल्या राज्यावरील प्रभाव इतका जबरदस्त, की राष्ट्रीय पक्षांशी दोन हात करून एक किंवा अधिक वेळा स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात ते यशस्वी झाले आहेत. पैकी, तूर्तास चर्चेत असलेले असे दोन नेते म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणजे ममता आणि अलीकडेच मुख्यमंत्रीपद गमावलेले चंद्राबाबू नायडू. गेली चार वर्षे केंद्र सरकारला कडवा विरोध करणाऱ्या ममता, चक्कं नरेंद्र मोदींची भेट मागतात. आणि सीबीआयला भाजपचा हस्तक म्हणणारे चंद्राबाबू स्वतःच्या नातलगाच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करतात. या दोन्ही घटनांवर आधारलेला आजचा निवडक अग्रलेख पुढारीचा. पुढारी - ममता आणि चंद्राबाबू https://bit.ly/2lYfmKd संपादक - विवेक गिरधारी *** आजचे अन्य अग्रलेख लोकमत - हे तो छत्रपतींचे राज्य! https://bit.ly/2kR40Y0![]()
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
निवडक अग्रलेख १९ सप्टेंबर २०१९
पुनश्च
सुधन्वा कुलकर्णी
2019-09-19 09:30:19
वाचण्यासारखे अजून काही ...
sa
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च

शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग पहिला
रियासतकार गो. स. सरदेसाई | 3 दिवसांपूर्वी
दाराला माणसांची परीक्षा नसल्यामुळे भलतेच लोक त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेत
भावगीत गायनाचा जमाना आतां संपला
पद्माकर कुलकर्णी | 6 दिवसांपूर्वी
आजचे म्हणजे नवकवि. त्यांच्या काव्यात गेयता औषधालाहि नाही
काँगो - उत्तरार्ध
पां. वा. गाडगीळ | 2 आठवड्या पूर्वी
आणि बेल्जियमचें सैन्य अजूनहि कांगोंत तळ देऊन बसले आहे.
काँगो - पूर्वार्ध
पां. वा. गाडगीळ | 2 आठवड्या पूर्वी
गोरे सशस्त्र लोक दिसले की, कांगोतील काळे अडाणी लोक घरेदारे सोडून पळून जात असत
उर्दू रंगभूमि - भाग तिसरा
सेतूमाधवराव पगडी | 3 आठवड्या पूर्वी
इस्मत चुगताईचें 'धानी बांकें' जातीय ऐक्याच्या विषयावर रचलें आहे.
उर्दू रंगभूमि - भाग दुसरा
सेतूमाधवराव पगडी | 3 आठवड्या पूर्वी
पारशी नाटककारांनंतर पहिल्या उर्दूभाषी नाटककाराचें नांव रौनक़ बनारसी होय.