अवकाश कवेत घेणारी माणसं...

पुनश्च    रुचिरा सावंत    2019-09-30 19:00:24   

माणसाचं मोठेपण अनेक गोष्टींवर अवलंबून असतं हे आजवर ऐकलेलं, वाचलेलं आत्ता अनेक अनुभवांती उमजू लागलं आहे मला. सहज सुंदर दिसणारं ते यश, प्रसिद्धी, कर्तृत्व यासाठी किती घटक, सवयी आणि गोष्टी कारणीभूत असतात ना! मी कायम म्हणते की, सहवासांच्या बाबतीत मी फार भाग्यवान आहे. अनेक दिग्गजांना फार जवळून अनुभवण्याची, त्यांना जाणून घेण्याची, ऐकण्याची संधी मला वेळोवेळी मिळालीय. ही संधी माझ्यासाठी केवळ त्यांना भेटण्याचं निमित्त किंवा त्यांच्यासोबत एखादा फोटो घेण्याची लगबग यासाठी नसतेच हेही माहितीय मला. त्याही पलीकडे जाऊन त्या व्यक्तीकडून जे काही घेता येईल, शिकता येईल यासाठी असते. आपल्या खुजेपणाची जाणीव होऊन न्यूनगंड येण्यापेक्षा त्यांच्या मोठेपणामुळे प्रेरणा घेण्यासाठी असते. त्यांच्या एकाच अंगणात गुण्यागोविंदाने नांदणारं कर्तृत्व आणि साधेपणा पाहत थक्क होण्यासाठी असते. आणि आत्मावलोकन करण्यासाठी तर नक्कीच असते! शक्यतो अशा अनुभवांनंतर,भेटींनंतर, "हे अनुभव माझे आहेत आणि केवळ माझ्यासाठीच आहेत. मला कुणालाच दाखवायचे नाहीत." असं म्हणत मग मी माझ्यापुरते डायरीत लिहून ठेवते. आणि जेव्हाही प्रेरणेची गरज जाणवते तेव्हा ती डायरी उघडून गुपचूप त्यांची पारायणं करते. हे असं मी त्या अनुभवांना पर्सनलाईज्ड असल्यामुळे माझ्यापुरतं दडवून ठेवत असले तरी माझ्या एका मनाला कायम वाटतं की या मोठ्या, प्रसिद्ध माणसांचा हा प्रवास सर्वांपर्यंत पोहोचायला हवा. त्यांच्या वागण्यातील शालीनता, आणि आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींकडेही बारकाईने लक्ष पुरवण्याची सवय हे सगळं सगळ्यांना अनुभवता यावं. हे असं कायम वाटत असलं तरी काही वेळा ते फार प्रकर्षाने जाणवतं आणि मग पर्सनलाईज्ड अनुभवांपलीकडच्या, इतरांनाही प्रेरणा देतील अशा गोष्टी ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , विज्ञान- तंत्रज्ञान , व्यक्ती विशेष , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts