“भारतीय संघराज्यातील राज्यपाल व त्याचे अधिकार”

पुनश्च    दिगंबर राणे    2019-10-16 06:00:55   

एखाद्या राज्यात राजकीय पेचप्रसंग उभा राहिला की राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागते. केंद्रात जो पक्ष सत्तेवर त्याच्या कलाने किंवा त्या राज्यपालांची नियुक्ती ज्या राजकीय पक्षाच्या कृपेने झालेली आहे, त्या पक्षाला अनुकुल अशी भूमिका घेण्याकडे बहुधा राज्यपालांचा कल असतो हे कटू सत्य आहे. नियम वाकवता येतात आणि संकेत पायदळी तुडवता येतात एवढेच त्यातून आपल्याला कळते. अलिकडेच कर्नाटकमध्ये आपण याचा अनुभव घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यपालांचे नेमके अधिकार काय असतात याचा घटनात्मक उहापोह करणारा हा लेख आहे. १९६७ च्या नोव्हेंबर महिन्यात पश्चिम बंगालमध्ये झालेल्या राजकीय संघर्षाच्या निमित्ताने हा लेख ‘नवभारत’ च्या फेब्रुवारी १९६८च्या  प्रसिद्ध झाला होता. .............................. अंक – नवभारत, फेब्रुवारी १९६८ पश्चिम बंगाल राज्यातील राजकारणात अलिकडे ज्या नाट्यमय घटना घडल्या, त्यांनी सर्व देशाचे लक्ष वेधून घेतलेले आहे. प. बंगालचे राज्यपाल धर्मवीर यांनी १७ नोव्हेंबर १९६७ रोजी कम्युनिस्ट प्रणीत संयुक्त आघाडीचे मुखर्जी मंत्रीमंडळ अचानक बडतर्फ केले. त्यानंतर सभापती बॅनर्जी यांनी ‘जशास तसे’ या न्यायाने डॉ. घोष यांच्या नव्या मंत्रीमंडळास मान्यता न देता विधानसभाच बेमुदत तहकुब करून टाकली. राजनैतिक गोटातच नव्हे तर सामान्य माणसांच्याही, ही राजकीय उलथापालथ अभूतपूर्व चर्चेचा विषय झालेली आहे. परंतु पश्चिम बंगालमधील हा राजकीय गोंधळ, घटनात्मक पेचप्रसंग आहे, राजनैतिक डावपेच आहेत की आणीबाणमीची परिस्थिती तेथे उद्भवली आहे, यासंबंधी जनमानसात अजूनही संभ्रम आहे. काही काँग्रेसविरोधी पक्षांनी, तसेच मोठमोठ्या घटनातज्ञांनी, कायदेपंडितांनी व सामाजिक, राजकीय शैक् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , नवभारत

प्रतिक्रिया

  1. advshrikalantri@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    राज्यपालान्च्या अधिकार या विषयावर वरील लेख लिहिल्या नन्तर खूप पाणी वाहून गेले आहे।राज्यपालानी निष्पक्ष राहिले पाहिजे, ही अपेक्षा आहे।पण राज्यपाल आणि सभापती हे नेहमीच ज्या पक्क्षा मुळे पद मिळाले त्या न्चे हित पाहतात।या वर सुप्रीम कोर्टाने अनेक नियम बनवले आहेत।ममता ब्यानर्जी राज्यपालाना सतत डिवचत असते ।ही एक चुकीची पद्धत आहे।

  2. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    सगळेच कायदे आणि नियम आदर्श असतात. प्रश्न अंमलबजावणीचा असतो.. लोकांची अपेक्षा आदर्श व्यवस्थेचीच असते. पण घडतं ते भलतंच... आणखी एक: कायद्यासंबंधी एक सूत्र सांगितले जाते.. सर्वसाधारणपणे (गंभीर गुन्हे सोडून )कायद्याचे उल्लंघन झाल्यास शिक्षा सौम्य असावी पण अंमलबजावणी कडक असावी. आपल्यकडे उलट आहे. शिक्षा कडक आहेत पण अंमलबजावणी सौम्य आहे. सर्वत्र राजकारण सोयीचेच असते. म्हणूनच राजकारण ह्या शब्दाला नेहेमी negative shade असते..



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts