दुर्गाबाई भागवतांची प्रतिमा गंभीर, विचारगर्भ अथवा लालित्यपूर्ण लेखनाची आहे. प्रसंगी एकेकाची चंपी करायला मागे पुढे न पाहणारी लेखिका म्हणूनही त्यांची ख्याती आहे. बोधकथांचा शोध त्यांनी घेतला आणि अनेक नमुनेदार कथा त्यांच्या हाती लागल्या, त्याच शोधात त्यांना गवसलेली ही एक लोककथा. म्हटले तर मजेदार, म्हटले तर गंभीर. म्हटले तर अतर्क्य, म्हटले तर मानवी स्वभावावरील मल्लीनाथी. परंतु ती आपल्याला पुढे खेचून नेत राहते- एक होती म्हातारी. तिला होता एक मुलगा. एक दिवस काय झाले? गांवच्या राजाने पण मांडला. जो मला शतरंगीचे फूल आणून देईल त्याला अर्धे राज्य बक्षीस! शतरंगीचे फूल शंभर रंगांचे, शंभर पाकळ्यांचे, शंभर वासांचे, पृथ्वीच्या पार नागलोकांच्या देवलोकांत मिळणारे कोणी तें नजरेने पाहिले नव्हते. कोण ते आणणार? कुठून आणणार? गांवोगांवी वर्दी गेली. पण कुणी पैजेचा विडा उचलीना. मोठेमोठे राजे पण पुढे येईनात. एक दिवस मुलगा आईला म्हणाला, ‘आई, तू जा आणि विडा उचलून आण. मी जातो.’ म्हातारी म्हणाली, ‘कशाला रे बाबा? मोठमोठे राजे पुढे येत नाहीत आणि तूं कशाला जातोस? मोफत मरशील मात्र’ पण मुलगा ऐकेना. त्याने हट्ट धरला. मग म्हातारी राजवाड्यांत गेली. आणि तिने विडा उचलला. राजाला नवल वाटले. ‘म्हातारे, तू कां विडा उचलतेस? तुला शतरंगीच्या फुलाची माहिती आहे?’ म्हातारी म्हणाली, ‘मी म्हातारी. मला कुठून माहिती? मी कसची जाते? माझा मुलगा आहे, त्याने मला विडा उचलायला सांगितले म्हणून मी आले.’ मग म्हातारीने विडा मुलाला दिला. तो घेऊन मुलगा आणि म्हातारी दोघे राजवाड्यांत आले. मुलगा आईला म्हणाला , ‘पंचवीस रुपये राजाजवळ माग.’ म्हातारीने पंचवीस रुपये मागितले. राजा म्हणाला, ‘पंचवीस रुपये कसे पुरतील? दोन
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jitendra Dorle
4 वर्षांपूर्वीसुंदर परी कथा...
Shubhangi Kadganche
5 वर्षांपूर्वीउत्सुकता वाढवत नेणारी कथा
admanebabasaheb@gmail.com
6 वर्षांपूर्वीमाझ्या मुलांना खुप खुप आवडली
manisha.kale
6 वर्षांपूर्वीछान आहे कथा. वेगळी वाटली.
MADHAVIMD
6 वर्षांपूर्वीअजिबात नाही आवडला, खूप बाळबोध वाटला.
patankarsushama
6 वर्षांपूर्वीशेवटपर्यंत उत्सुकता वाटते. छान.
shriniwaslakhpati@gmail.com
6 वर्षांपूर्वीअसा असावा. पण तरीसुद्धा ही कथा संपेपर्यंत आता पुढे काय ?पुढे काय ? अशी उत्सुकता शेवटपर्यंत होती. दुर्गाबाई ग्रेटच !
shriniwaslakhpati@gmail.com
6 वर्षांपूर्वीखुप-छान ! काही काही शब्दांचे अर्थ कळले नाहीत. उदाहरणार्थ -- राखण्या म्हणजे राखण करणारा किंंवा
Advddp
6 वर्षांपूर्वीमस्त
shripad
6 वर्षांपूर्वीछान!