पृथ्वी जेव्हा कथ्थक नाचते तेव्हा...


सातारा जिल्ह्यातील कोयनानगरच्या महाप्रलयंकारी भूकंपाला ५० वर्षे होऊन गेली आहेत.  पहाटे चारच्या सुमारास भूकंप झाल्याने त्यात मोठी हानी झाली होती.  दोनशेच्या आसपास बळी गेले आणि हजारो जखमी झाले. कोयना प्रकल्पासाठीच्या कर्मचाऱ्यांची क्वार्टर्सही त्याच परिसरात होती. प्रत्यक्ष अनुभलेल्या त्या भूकंपाच्या स्मृती लगेचच चार महिन्यांनी या क्वार्टरमधील एका कुटुंबातील गृहिणीने लिहिल्या होत्या आणि त्या ललना या मासिकाच्या फेब्रुवारी १९६८च्या अंकात प्रसिद्ध झाल्या होत्या. येत्या ११ डिसेंबरला त्या दुर्दैवी घटनेला ५२ वर्षे होतील. सौ. मीनाक्षी सरदेसाई या गृहिणीने वर्णन केलेले, अंगावर काटा आणणारे ते क्षण वाचू या पुनश्च- ........................... अंक- ललना, फेब्रुवारी १९६८ ११ डिसेंबर १९६७ची ती पहाट!...गुलाबी थंडीतल्या नीरव शांततेत कोयनानगरी नुकती कुठे साखरझोपेचा चुटका घेत होती; इंद्रधनुष्यासारख्या स्वप्नफुलांचा गंध हुंगत होती; उबदार रंगात काकडणाऱ्या थंडीत गुरफटून टाकीत होती; आणि एकाएकी त्या गंधित उद्यानांतून काळ्याकुट्ट खोल डोहात ढकललं गेल्याचा तो भास... तो भास होता? स्वप्न होतं की सत्य?... त्या पहाटे, त्या क्षणी—खरंच कळलं नाही की काय होत आहे आणि काय होणार आहे! तसं पहायला गेलं तर भूकंपाचे धक्के आम्हांला अपरिचित नव्हते. १३ सप्टेंबरला बसलेल्या आणि नंतरही सतत बसणाऱ्या धक्क्यामुळे सारे कोयनावासी काहीशा अनिश्चित वातावरणात वावरत होते. तरी पण खोल्यांच्या मध्यभागी झोपायचं, मुलांना कॉटखाली झोपवायचं, आणि धक्का बसला की बाहेर पडायचं, याशिवाय काय करणं आमच्या हातात होतं?... रविवारचा सुटीचा दिवस इतका धामधुमीत गेला की नऊला आम्ही झोपलो. ११—५५ ला जरा जोरदार धक्का ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुनश्च , अनुभव कथन , ललना

प्रतिक्रिया

  1. SMIRA

      5 वर्षांपूर्वी

    महाभयंकर..... वाचतानाही अंगावर शहारे आले

  2. Meenalogale

      5 वर्षांपूर्वी

    प्रत्यक्षदर्शी वर्णन.अंगावर काटाआला.

  3. manisha.kale

      5 वर्षांपूर्वी

    खरोखरच अंगावर शहारा आणणारा प्रसंग. निसर्गाचा कोप झाला तर होत्याच नव्हतं एका क्षणात होतं.शेवटी माणूस कितीही हुशार असुदे, अनेक शोध लावूदे पण निसर्गा पुढे तो हतबलच होतो हे विसरतो.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts