'तो सिम्स दे मला!' दिवसातून दहा वेळा माझी मागणी असते. सिम्स व्हजायनल स्पेक्युलम हे एका हत्याराचे नाव. बोली भाषेत नुसतेच सिम्स. हत्यार हा सुद्धा शब्द चुकीचा आहे. ह्याला काही धारबीर नसते. उपकरण म्हटलेलंच बरं. बायकांच्या तपासणीला हे अति उपयोगी. त्यामुळे सतत वापरात असलेले. अगदी सलामीलाच ह्याची ओळखदेख होते. सिम्स म्हणजे फार काही भारी चीज आहे असं समजू नका. अगदीच साधी गोष्ट आहे ही. आतून तपासायचे तर योनीमार्ग फाकवून धरायला हवा. मग डॉ. सिम्स यांनी, चक्क योग्य त्या आकाराचा डाव, हो हो आमटी वाढून घेतात तो डाव, त्याचे हँण्डल वाकवून वापरायला सुरवात केली. त्याचीच सुधारित आवृत्ती म्हणजे आजचा सिम्स. किती साधीशी गोष्ट. पण त्यांनी केली आणि त्यांचे नाव चिकटलं त्याला. जर कोणा कुलकर्ण्यानी हा शोध लावला असता तर, 'ए, हा नको. तो मोठ्या साईजचा कुलकर्णी दे मला!' असं काहीतरी म्हणालो असतोच की सगळे. सिम्सशिवाय आम्हा गायनॅकॉलॉजीस्टचं पान हलत नाही. पंक्चरवाल्याचा जसा पाना, न्हाव्याची जशी कात्री, तसा आमचा सिम्स. तर ह्याचा कर्ता, जे मारीऑट सिम्स. स्मार्ट होता. उंचापुरा, गरुड नाक, अगदी देखणा. स्त्रीरोगशास्त्राचा पिता म्हणून गौरवलेला हा अमेरिकन डॉक्टर. तिथेच दक्षिणेत अलाबामात प्रॅक्टिस करायचा. अमेरिकेत आणि दक्षिणेत म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलं का तुमच्या? जगज्जेत्या अमेरिकेचा हा दक्षिण भाग यादवी युद्धापूर्वी कुख्यात होता तो तिथल्या वर्णभेदासाठी आणि गुलामीसाठी. गायनॅकॉलॉजीच्या ह्या फादरने अनेक छोटे मोठे शोध लावले. बायांना पुरुष डॉक्टरांसमोर तंगड्या फाकवून झोपवले जायचे, अगदीच संकोचवाणं सगळं. सिम्सनी हे बदललं. कुशीवर वळलेल्या अवस्थेत पेशंट तपासायला सुरवात केली. ह्याला आता म्हणतातच मुळी ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
sudhir.belhe
6 वर्षांपूर्वीछान लेख.