गोमंतकाचे एक थोर समाजसेवक श्री. केशवराव अनंत नायक


महाराष्ट्र  आणि गोवा ही दोन्ही  मराठी संस्कृतीची केंद्रे असली तरी गोव्यातील अनेक  महत्त्वाच्या समाजनायकांचा आणि त्यांच्या मोठेपणाचा  महाराष्ट्राला परिचय नाही. केशव अनंत नायक हे त्यातलेच एक. १९७० साली ‘दीपावली’ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख आहे. ‘पुनश्च’च्या व्यक्तिपर लेखांच्या मालिके अंतर्गत देत असलेल्या या लेखात  नायक यांच्या कार्याविषयी, मोठेपणाविषयी तर लिहिलेले आहेच, शिवाय गोव्यातील त्या वेळच्या सामाजिक घटकांविषयही मजेदार माहिती,किस्से दिलेले आहेत. १९२१ सालच्या एका व्याख्यानमालेत ‘सोशल सर्व्हिस लीग’चे अनंत वि. चित्रे यांचे ‘मद्यपान’ या विषयावर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते,त्याचा किस्सा तर धमालच आहे… गोमंतकाच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अत्यंत तळमळीचे कार्यकर्ते श्री. केशवराव अनंत नायक यांच्या वयाला सप्टेंबर महिन्यात पंचाहत्तर वर्षे पूर्ण होऊन त्यांनी शहात्तराव्या वर्षात पदार्पण केले. येत्या नोव्हेंबर महिन्यात गोव्यामध्ये त्यांचा अमृत महोत्सव मोठ्या थाटाने साजरा होणार आहे. या निमित्ताने आम्हीही श्री. नायक यांना विनम्रभावाने अभिवादन करून हे सन्मानपुष्प त्यांना अर्पण करीत आहोत आणि त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि भरपूर मनःस्वास्थ्य लाभो अशी प्रार्थना करतो. – संपादक ********** अंक –  दिपावली,ऑक्टोबर १९७० श्री. केशव अनंत नायक यांचे नाव घेतले की एक शांत, सौम्य वृत्तीची व धीरगंभीर अशी व्यक्ती आपल्या मनश्चक्षूंसमोर उभी राहते. पण प्रसंग आला तर ही व्यक्ती तितकीच खंबीर व करारी आहे असे आपल्याला आढळून येईल. श्री. नायक यांचा जन्म आपल्या लहानशा गोमंतकात झाला हे आमचे सुदैव तर एका दृष्टीने पाह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


व्यक्तीविशेष , दीपावली

प्रतिक्रिया

  1. lahamged@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    छान

  2. arush

      5 वर्षांपूर्वी

    अतिउत्तम व सखोल माहिती



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts