लावणीतला रसरशीत शृंगार

पुनश्च    राजाभाऊ थिटे    2020-01-22 06:00:36   

लावणी आणि तमाशा यासारखे प्रकार एकेकाळी सामाजिक गरजेतून जन्माला आले. पुढे शहरी पांढरपेशांनी या प्रकाराला नाके मुरडायला सुरुवात केली. परंतु लावणीतला शृंगार हा अस्सल होता कारण त्याची पाळेमुळे 'गौळण' या प्रकारातच आहेत. लावणीचा भरभराटीचा काळ, लावण्यांच्या चालींमधूनच जन्माला आलेली नाट्यपदे आणि लोककलांच्या इतिहासाची उजळणी करणारा हा लालित्यपूर्ण लेख आहे तब्बल साठ वर्षांपूर्वीचा. लेखक राजाभाऊ थिटे हे स्वतः शाहीर होते तसेच त्यांनी उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध शाहीर हैबतीबुवा यांचे  लिहिलेले चरित्र १९५६ साली प्रसिद्ध झाले होते. अंक- रोहिणी,  फेब्रुवारी १९५९ तमाशांतील लावणी (मूळ शीर्षक) महाराष्ट्रांत ‘लावणी’ अगर ‘गौळण’ हा वाङ्मयप्रकार जवळ जवळ  इसवीसन १६०० पासून जास्त उदयास आला. एकनाथांनी गौळणी रचल्या. त्या भजनांत आज सररास प्रचलित आहेत. तो स्वराज्याचा उषःकाल होता. त्या वेळचे फारसे वाङ्मय लिखित स्वरूपांत आज उपलब्ध नाही. पेशव्यांच्या काळांत लावणीला राजदरबारी बराच मान होता. मूळच्या लावणी पोवाड्यांतला वीरांचा शृंगार जाऊन आता तो नेभळटांचा व षंढांचा शृंगार झाला. रावबाजींच्या उत्तेजनाने पुणे शहरांत व त्या शहराचा वारा लागून जेथे तेथे शिमग्याचे चांदणे वाढत चालले होते. दिवसास ब्रह्मभोजनाचा थाट आणि दिव्यांत वात पडली नाही तो मंदिरांत चौघडे, सनया यांचा मंजूळ घोष, श्रीमंतांच्या व सरदार लोकांच्या वाड्यांत सरकारी ताफ्यांचे मुजरे, रात्रीस रस्त्यांत आणि बोळांत फिरणाऱ्या विलासी लोकांची मने ओढून घेणारे, नुकतेच चिमणी, साळू, मैना यांच्या मंजूळ कंठांत होनाजी बाळाने घातलेले खडे सूर आणि फौजेवरही शिलेदार, बारगीर, शिपाई आणि शहरांतील शिंपी, माळी, सराफ, दुकानदार य ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , ललित , रोहिणी

प्रतिक्रिया

  1. किरण भिडे

      5 वर्षांपूर्वी

    ur membership is active. pls login to read article...if u don't remember login, do let us know.

  2. iamanil.rd@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    Team Bahuvidh, Why I am prompted to became member as I renewed in last week. Please guide me.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts