वाचकांची दिवाळी


आम्हा भारतीयांना सणांचे महत्व वेगळे सांगायला नको. अंधारलेल्या मनाला कायम तरतरीतपणा राहावा म्हणून योजिलेली ही मुळातली कल्पना. कालपरत्वे यात बदल होत गेले आणि बदल होत जातील कारण माणसाच्या मनाची ही भूक कायम राहणारी आहे. त्यात देखील दीपावलीचे महत्व आगळेवेगळेच. वर्षभर ज्याची सगळेच वाट पाहतात असा हा सण. दिवाळी म्हटली की गोडधोड, मेवामिठाई, नवे कपडेलत्ते, रोषणाई असा मोठा जल्लोष असतो. या मध्ये वाचकांच्या लेखी आणखी एक गोष्ट असते, ज्याच्याशिवाय ही दिवाळी पूर्ण होऊ शकत नाही ती गोष्ट म्हणजे दिवाळी अंक! किंबहुना असं ही म्हणता येईल की दिवाळीच्या निमित्ताने वाचनानंद देणारी कल्पना सर्वप्रथम मराठीमध्येच आली. विविध प्रकारचे अंक : वाचक कुठल्याही प्रकारचा असो त्या सर्वांसाठी दिवाळी अंक आहेत. कथा, कादंबरी, विनोद, भविष्य, पाककला, मनोरंजन, गुढकथा, रहस्यकथा, लहान मुलांसाठी सुद्धा बाल विशेषांक असे नाना प्रकार सांगता येतील. मौज, दीपावली, दिपलक्ष्मी, धनंजय, चंद्रकांत, हंस, नवल, मोहिनी, ललित, साहित्यसूची, पद्मगंधा असे हे काही अंक आता प्रस्थापित आहेत. जणू ही नाव ब्रॅन्डनेमच. असे जवळजवळ ३०० ते ४०० दिवाळी अंक निघतात. त्यात दरवर्षी भरच पडत असते. दिवाळी अंकाचा प्रारंभ  : मग दिवाळी अंक हि प्रथा केव्हा पासून चालू झाली? याचे श्रेय काशिनाथ रघुनाथ मित्र   यांच्याकडे जाते. त्यांनी त्यांच्या मासिक मनोरंजनाचा हा  दिवाळी अंक सर्वप्रथम १९०९ च्या दिवाळीत सुरू केला.  इथे हे ही सांगायला पाहिजे त्या अगोदरदेखील १० ते १२ वर्ष  मासिक मनोरंजन नियमितपणे प्रकाशित होत होते. वाचकांना आकर्षित करण्याकरिता त्यांनी विविध उपक्रम केले. त्या पैकीच त्यांचा एक उपक्रम म्हण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , प्रासंगिक , भाषा , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. विकास पोवार

      8 वर्षांपूर्वी

    खुपच छान कल्पना खुपच छान साहित्य



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts