असे देखणे होऊया !!

पुनश्च    बा. भ. बोरकर    2017-10-18 09:59:59   

'कवी बा. भ. बोरकरांच्या कवितेतले 'देखणे'पण आपल्या सर्वांना मिळो' या  शुभेच्छा !! देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे । गोरटे की सावळे, या मोल नाही फारसे ॥ तेच डोळे देखणे, जे कोंडीती सार्‍या नभा । वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा ॥ देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे। आणि ज्यांच्या लाघवाने, सत्य होते कोवळे ॥ देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे । मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे ॥ देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती । वाळवंटातूनसुद्धा, स्वस्तिपद्मे रेखिती ॥ देखणे ते स्कंध ज्या ये, सूळ नेता स्वेच्छया । लाभला आदेश प्राणां, निश्चये पाळावया ॥ देखणी ती जीवने, जी  तृप्तीची तीर्थोदके । चांदणे ज्यातुन वाहे, शुभ्र पार्‍यासारखे ॥ देखणा देहान्त तो, जो सागरी सुर्यास्तसा । अग्निचा पेरुन जातो, रात्रगर्भी वारसा ॥ ********** कवी  -बा. भ. बोरकर Google Key Words- मराठी कविता, बाळकृष्ण भगवंत बोरकर, बाकीबाब, Marathi Kavita, Kavita, Ba.Bha. Borkar, Marathi Poet. ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कविता रसास्वाद , कविता , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. Ashwini Gore

      3 वर्षांपूर्वी

    किती उदात्त विचार !! 👌

  2. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    खरे देखणेपणाचे नेमके सार,

  3. Medha Vaidya

      3 वर्षांपूर्वी

    सोप्या नेमक्या शब्दात देखणेपणा ची नवी दृष्टी देणारी अप्रतिम कविता

  4. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    सुंदर, अप्रतिम काव्य!

  5. मोहिनी पिटके

      7 वर्षांपूर्वी

    बोरकर देखणेपणाचा नवा अर्थ सहजपणे उलगडून दाखवतात तेच डोळे देखणे जे आकाशव्यापी दु: खाला कवेत घेतात . हे देखणेपण खरे श्रेयस आहे .

  6. Varsha Vipra

      7 वर्षांपूर्वी

    Apratim

  7. अमर पेठे

      7 वर्षांपूर्वी

    देखणेपणा म्हणजे दिसायला सुंदर असाच समज होता, ह्या कवितेने वेगवेगळ्या प्रकारे देखणेपण पाहता आले फार मस्त

  8. M.R.PANDAO

      7 वर्षांपूर्वी

    very nice

  9. M.R.PANDAO

      7 वर्षांपूर्वी

    sundar

  10. neelampra

      7 वर्षांपूर्वी

    बाकीबांचे हे काव्य आणि संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हे कुठेतरी मिळते जुळते आहे असेच वाटते !! प्रदीप जोशी

  11. milindvh

      7 वर्षांपूर्वी

    असे सर्वांगी देखणेपण प्राप्त होणे जाऊदे, किमान ते समजणारी नजर मिळाली तरी भरुन पावलो असं वाटेल.

  12. Aparna Abhijit Apte

      7 वर्षांपूर्वी

    sundar

  13. mugdha bhide

      7 वर्षांपूर्वी

    apratim ……. kalpanashaktila salam



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts