आता आंदोलने का होत नाहीत?

पुनश्च    अमर हबीब    2020-03-07 06:00:56   

अंक : अंतर्नाद, २०१२  `महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे!` असे महात्मा गांधी म्हणाले होते. कारण सामाजिक सुधारणांचे अनेक झरे महाराष्ट्रात जागोजागी फुटल्याचे  तेंव्हा दिसत होते. या झऱ्यांचा प्रवाह विस्तारुन त्याचे मोठ्या धारेत रुपांतर व्हायचे तर त्यासाठी नेतृत्वाच्या मागे येणारा कार्यकर्त्यांचा जथा लागतो. आंदोलने त्यातूनच जन्माला येतात. सामान्य माणसाच्या मनात साचलेले असमाधान, त्यासाठी रस्त्यावर येण्याची त्यांची तयारी आणि त्या तयारीला विधायक वळण देण्याचे सामर्थ्य असलेले नेतृत्व यातून आंदोलने होत असतात. आजच्या काळात आंदोलने होताना का दिसत नाहीत? या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना अमर हबीब यांनी नेमके उत्तर दिले होते, २०१२ साली ‘अंतर्नाद’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रस्तुत लेखात. अमर हबीब हे मूळचे उत्तर प्रदेशचे. ते महाराष्ट्रात आले आणि अंबाजोगाई येथे स्थायिक झाले. शालेय शिक्षण घेत असताना ते राष्ट्र सेवा दलाकडे खेचले गेले. १९७४ ला मराठवाडय़ात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. आणीबाणीचा निषेध केला. मिसाखाली १९ महिने तुरुंगवास भोगला. १९८० पासून ते शेतकरी आंदोलने करीत आहेत. गावोगाव भटकंती करून शेतकरी चळवळीचा विचार ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतात. ‘भूमिसेवक’ हे साप्ताहिक त्यांनी काही काळ चालवले. ********** ज्यांनी उभ्या हयातीत कधी आंदोलनात भाग घेतला नाही, तेच साळसूदपणे विचारतात, ‘हल्ली आंदोलने वगैरे काही दिसत नाहीत?’ बहुतेक नोकरी करणारे लोक असा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , समाजकारण , राजकारण

प्रतिक्रिया

  1. Amar Habeeb

      5 वर्षांपूर्वी

    आभारी आहे!

  2. purnanand

      5 वर्षांपूर्वी

    अंतर्नाद अंकाच्या स्वरुपात लेख संग्रही आहेच पण एक छान लेख पुन्हा वाचनाचा आनंद दिला याबद्दल धन्यवाद.

  3. smotkurwar123@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    उत्तम

  4. asmitaphadke

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts