साबण निर्मितीच्या धडपडीची गाथा

पुनश्च    नी. म. केळकर    2020-03-14 06:00:53   

अंक – यशवंत, ऑक्टोबर १९५१ आज साबणाचे शेकडो ब्रँड्स आपल्याला दिसतात परंतु एकेकाळी साबण वापरणे ही केवळ श्रीमंतांची मक्तेदारी होती. साबण स्वस्त होऊन घरोघरी पोचवण्यात ज्या शेकडो प्रयत्नांचा उपयोग झाला त्यातील एका प्रकरणाची माहिती प्रस्तुत लेखात आहे. विशेष म्हणजे हा प्रयत्न १९३० साली बाळासाहेब वर्तक या मराठी माणसाने केला होता.  साबण हा शब्द भारतात आला तो अरेबिक भाषेतून. साधारण पंधराशे वर्षांपूर्वी भारताचा जगाशी व्यापार सुरू झाला, त्यातून हा शब्द आला. साबणाच्या निर्मितीचे अनेक प्रयोग त्याकाळी जगभर सुरू होते.  सतराव्या शतकाच्या मध्यास होऊन गेलेल्या संत तुकारामांच्या एका अभंगात सुद्धा 'नाही निर्मळ मन, काय करील साबण' असे म्हटले आहे. तुकारामांना अपेक्षित असलेला साबण अर्थातच आजच्या काळातला नव्हता, तो त्याकाळी राख,वनस्पतीजन्य तेले, चुनखडी यांपासून बनवला जात असे. साधारण दोन हजार वर्षे घरगुती साबण विविध प्रकारांनी अस्तित्वात आहे परंतु एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस जगभर साबणाचे औद्योगिक उत्पादन सुरू झाले. भारतात १९००च्या सुमारास साबण वापरला जाऊ लागला. त्यानंतरच्या काळात देशभर एतद्देशीयांनी साबण निर्मितीचे प्रयत्न केले. नव्या युगाची कास धरणाऱ्या औंधच्या पंतप्रतिनिधींनी १९३० साली  साबण कारखाना काढला. त्याचवेळी बाळासाहेब वर्तक या सामान्य मराठी माणसाने नोकरी, संसार, आजार, आर्थिक चणचण यांचा सामना करीत साबणाचा कारखाना काढण्याचा कसा  प्रयत्न केला त्याची ही संस्मरणीय गाथा आहे. ती १९५१ साली यशवंत मासिकात प्रसिद्ध झाली होती. पूर्ण लेख बराच मोठा आहे. त्यातला काही संपादित अंश आपल्या वाचकांसाठी देत आहोत. (मूळ शिर्षक : डेक्क ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


व्यक्तिविशेष , यशवंत , उद्योग

प्रतिक्रिया

  1. parkarman

      5 वर्षांपूर्वी

    खुपच छान, आत्मनिर्भर बनण्यासाठी अशा लेखांना व्यापक प्रसिद्धी मिळायला हवी

  2. ganesh.dolas16@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    खुपच छान आणि स्फुर्तिदायक

  3. rohitbhide90

      5 वर्षांपूर्वी

    अप्रतिम

  4. smmohite.hr@outlook.com

      5 वर्षांपूर्वी

    Superb

  5. rajakulkarni11@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    खूप सुरेख माहिती... मराठी माणसाने उद्योग करावा यासाठी प्रेरक लेख.... तसेच इतरही महाराष्ट्रीयन उद्यजकांच्या धडपडीचा प्रवास दिल्यास चांगलेच होईल.... विको turmeric चा प्रवास सुद्धा असाच परंतु आज ती जगभर पोहोचली

  6. Kadganche

      5 वर्षांपूर्वी

    खूप छान माहिती. स्फुर्तीदायक व्यक्तिमत्त्व



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts