‘अंतर्नाद’च्या मे महिन्याच्या अंकात डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी आपल्या ‘नोबेल आणि भारत’ या लेखात “विज्ञान-तंत्रज्ञन या क्षेत्रात जगाच्या नकाशावर अर्थपूर्ण परिणाम करणारे लेखन, संशोधन आपल्याकडे झाले नाही,” याबद्दल खंत व्यक्त केली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी काही दिशादर्शनही केले आहे; आणि शेवटी या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे अमलात आणल्यास “नोबेल पुरस्कार खेचून आणणे फारसे कठीण नाही,” असा आशावादही व्यक्त केला आहे. कुलगुरूंच्या ताब्यात भावी पिढ्यांचे भवितव्य असल्याने त्यांनी आशावादी असणे समजण्यासारखे आहे; पण माझ्यावर तशी काही जबाबदारी नसल्याने असेल कदाचित, मी त्यांच्याशी थोडी असहमती व्यक्त करण्याचे धाडस करतो. आम्ही आमच्या पायात काही बेड्या अडकवून घेतल्यामुळे प्रगत देशातील संशोधकांच्या बरोबरील शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवणे कठीणच राहणार आहे. या बेड्या कोणत्या आणि त्या का हटवता येणार नाहीत याची चर्चा येथे करण्याचा मी प्रयत्न करत आहे. काही चमत्कार होऊन माझे म्हणणे खोटे ठरल्यास मला सर्वात जास्त आनंद होईल; पण चमत्कार क्वचितच होतात. (जे नेहमीच होतात त्याला आपण चमत्कार म्हणत नाही.) अर्थात कुलगुरूंनी जे परिस्थितीचे विश्लेषण केले आहे त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. आपल्या देशातील शिक्षणाचा आणि संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणखीही काही ठोस उपायांची आवश्यकता आहे. दुखणे खोलवर रुजले आहे आणि माझ्या मते, आपण दीर्घकाळ त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे उपायही दीर्घकाळ करावे लागतील; पण तो स्वतंत्र विषय होर्सल म्हणून त्याची चर्चा येथे करत नाही. सर्वसामान्यपणे ज्याचा उल्लेख होत नाही अशा फक्त एकाच गोष्टीची मला येथे चर्चा करायची आहे. इतर सर्व उपाय ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
rsrajurkar
6 वर्षांपूर्वीKhup mahiti purn lekh .