भाषिक मनोरंजन

पुनश्च    ग. वि. केतकर    2017-12-07 18:02:48   

वसंतच्या जानेवारी १९७१  च्या अंकात  प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... चेष्टा व यातायात हे दोन्ही शब्द मूळ संस्कृत असून संस्कृतापासून झालेल्या प्राकृत मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये आले आहेत. पण त्यांचे अर्थ मात्र वेगवेगळे झालेले आहेत. ‘चेष्टा’ या शब्दाचा मूळ अर्थ हालचाल वागणूक. ‘सदृशं चेष्टते स्वस्या: प्रकृतेर्ज्ञानवानपि’ या गीतावचनाचा अर्थ- ज्ञानी देखील आपल्या प्रकृतीनुसार म्हणजे स्वभावानुसार वर्तन करतो. ‘विविधाश्च पृथक्‌ चेष्टा:’ या गीतेच्या शब्दांमध्येही वेगवेगळे कर्म किंवा आचरण असाच अर्थ दिसतो. पण हिंदी भाषेत चेष्टा याचा अर्थ प्रयत्न, खटपट असा झाला आहे. पं. मालवीय यांनी काशी विद्यापीठासाठी खूप ‘चेष्टा’ केली असे प्रयोग हिंदीमध्ये येतात. मराठीमध्ये ‘चेष्टा’ याचा अर्थ मात्र थट्टामस्करी असा रुढ आहे. प्रथम ‘मर्कटचेष्टा’ म्हणजे माकडाच्या हालचाली. त्या हालचाली विक्षिप्त व हास्योत्पादक असल्यामुळे मराठीमध्ये चेष्टा याचा प्रथम अर्थ हास्योत्पादक हालचाली असा झाला व पुढे सर्वसामान्य थट्टा असा अर्थ निघाला. ‘यातायात’ म्हणजे जाणे-येणे, प्रवास असा मूळ अर्थ. यामुळे हिंदीमध्ये एखाद्या पुढाऱ्याने प्रचारार्थ दौरा व प्रवास केला तर त्याला ‘यातायात’ शब्द लावतात. पण प्रवास हा बहुतांशी त्रासदायक, कष्टप्रद असा असतो. म्हणून मूळ प्रवास अर्थ जाऊन मराठीमध्ये ‘यातायात’ याचा अर्थ कठीण कष्ट असा रुढ झाला. वृषभ व बैल संस्कृतमध्ये श्रेष्ठ वा बलवान पुरुषाला प्रशंसेची विशेषणे म्हणून ‘पुरुषसिंह’ आणि ‘पुरुषर्षभ’, ‘भरतर्षभ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वसंत , ज्ञानरंजन , भाषा

प्रतिक्रिया

  1. Priyanka Mayur

      5 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे विशेषतः ढालगज भवानी या शब्दाचा अर्थ कळाला याचा आनंद जास्त आहे 😊

  2. Ninad Acharya

      8 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख...

  3. aparna kelkar

      8 वर्षांपूर्वी

    शब्दांचे जुने अर्थ कळल्यावर आनंद झाला

  4. milindvh

      8 वर्षांपूर्वी

    आजकाल "डोकं खाऊ नको" असा वाक्प्रचार प्रचलित आहे. याचा "खाण्यापेक्षा" नारळ "खवण्याशी" संबंध असावा. "डोकं नको खवू" खवण्याची रीत नष्ट होत चालली, पण अपभ्रंशाने टिकली आहे.

  5. mugdhabhide

      8 वर्षांपूर्वी

    waparat asalele shabdaprayog v tyanche ugamsthan wachayala maja aali ……



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts