अंक: 'नवनीत' एप्रिल १९६७ लेखाबाबत थोडेसे : एखाद्या गोष्टीचा प्रचार करण्यासाठी छोट्या मोठ्या समूहांसमोर भाषण देण्याची ज्यांच्यावर वेळ आली आहे त्यांना हा लेख म्हणजे स्मरणरंजनच असेल. आधी ते समूह गोळा करताना कठीण, मग त्यांच्यासमोर त्यांना समजेल अशा भाषेत विषय मांडणं त्याहून कठीण. पण समोर कोण बसलंय, किती जण बसलेत याचा विचार न करता नाउमेद न होता जो भाषण देऊ शकतो तो खरा वक्ता. या लेखात वाचा अशाच एका भाषण'बाजी'चे अनुभव. 'नवनीत' अंकात एप्रिल १९६७ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च... ********** (१) एकदा माझी लोकप्रियता एकाएकी अफाट वाढलेली पाहून माझी छाती फुगून गेली! पालघरला गणेशोत्सवात माझे व्याख्यान ठरलेले होते. जाहीर झालेल्या वेळी माझ्या यजमानासह मी व्याख्यानाचे ठिकाणाजवळ जाऊन पोचलो. पहातो तो ही गर्दी! बायकामुलांचा नि पुरुषांचा तोबा! गलबला नि आरडाओरड! आम्हाला आत प्रवेश मिळण्याची मारामार! आजचे ‘नामांकित’ वक्ते आले आहेत असा कोणी पुकारा केला तरी वाट मिळेना! एकही टाळी मिळाली नाही. नुसती रेटारेटी, गडबड नि गोंधळ! कसेबसे मला व्यासपीठावर नेऊन माझ्या खुर्चीवर बसविण्यात आले. सेक्रेटरींनी नमस्कारपूर्वक माझे स्वागत केले. उत्सवाचे अध्यक्ष स्थानापन्न झाले. सुदैवाने ध्वनिक्षेपक नादुरुस्त नव्हता. सभा सुरू होणार हे लक्षात घेऊन शांतता प्रस्थापित होईल अशी चालकांची अपेक्षा होती. माझी ओळख करून देण्यासाठी अध्यक्ष उभे राहिले. ‘बंधु-भगिनींनो’ या शब्दाने त्यांचे त ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .