अंक :- वसंत ; वर्ष:- दिवाळी १९८० कोणताही व्यवसाय निष्कंटक नसतो. राजाला नोकर-चाकर, प्रासाद-रंगशाळा, अलंकार-जामदारखाना सारे काही असते. असे असूनही त्याला सुखाची झोप येतेच असे नाही. जास्त जबाबदाऱ्या, जास्त लोकप्रियता किंवा अधिक उपद्रवशक्ती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य फुले-आणि काटे या दोन्हींनीही भरलेलं असतं. नुसते फुलांचे हार किंवा नुसताच काट्याचा रस्ता जगात अस्तित्वात नसतो, सुखदु:खांचे प्रमाण कमी-जास्त असेल, यश-अपयश यांच्या फूटपट्ट्याही बदलत असतील, पण या जगातील सर्वच प्रवासात फुलांचा गंध येतो-त्याच वेळेस काट्यांनी रक्तबंबाळही व्हावे लागते. मिळालेले सन्मान ही दु:खावरची फुंकर असते, आणि सोसावे लागते ते ते सारे अहंकाराच्या उपशमनार्थ असते. आपल्या देशातील प्रत्येक संपादक टिळक-आगरकर यांचाच वारसा सांगतात. पण मुळातच टिळक-आगरकर ही ब्रह्मकमळासारखी केव्हा तरी फुलणारी फुले. शिवाय ते संपादक नव्हतेच. हजारो गनीम अंगावर घेऊन लढणाऱ्या सेनापतींजवळील अनेक हत्यारापैकी वृत्तपत्र हे एक हत्यार त्यांनी वापरले एवढेच. शिवाय पत्रकार होण्यावाचून त्यांना पर्यायही नव्हता. हेतुपुरस्सर आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्या झालेल्या सुखासीन देशबांधवांना उकळत्या तेलाहून दाहक असणारे त्यांचे शब्द जागे करू शकणार होते. त्यामुळे ते संपादक झाले. त्यांचे नाव घेताना किंवा त्यांची जातकुळी सांगताना दहादा विचार करायला हवा. केवळ आपल्यालाही उडता येते म्हणून चिलटाने गरुडाची बरोबरी करण्यात काय अर्थ आहे? लोकमान्यतेचे हार त्यांच्या गळ्यात पडले, पण त्यासाठी मंडालेतील एकांत कोठडीत स्वत:चे रक्तही त्यांना जाळून प्यावे लागले. गळ्यात पडलेल्या प्रत्येक हारासाठी रक्ताच्या थेंबाथेंबाने किंमत चुकवताना मागे उरल्या त्या त ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
shripad
5 वर्षांपूर्वी"पहिल्या बाजीरावानं मस्तानी ठेवली, याबद्दल कुणी तक्रार करतं का? दुसऱ्या बाजीरावानं नुसतीच रंडीबाजी केली म्हणून लोक तक्रार करतात." अगदी खरे आहे. कर्तृत्ववान माणसाचे खाजगी जीवन पाहू नये. तेवढ्या स्वातंत्र्याचा हक्क त्याला निश्चितच आहे.
sakul
7 वर्षांपूर्वीपत्रकार आणि संपादक निःपक्ष असावा, असं सध्या समाज माध्यमांवर सतत ओरडून सांगणाऱ्यांनी हा लेख अवश्य वाचावा. 'सोबत' आणि 'माणूस' या साप्ताहिकांची एके काळी वाट पाहिली जायची. आपल्या मरणानंतर 'सोबत' चालू राहावे, अशी काही आपली इच्छा नाही, असेही बेहेरे यांनी एकदा कोठे तरी लिहिले होते. 'ते मतपत्र आहे आणि माझ्या मरणानंतर ते चालू राहण्यात काही अर्थ नाही,' असा त्यांच्या म्हणण्याचा आशय होता. न लिहिणाऱ्या संपादकांबद्दल त्यांनी 38 वर्षांपूर्वी लिहिलं. अशा संपादकांची आज चलती आहे. >कित्येकदा आपल्या मनात काही व्हावे अशी इच्छा असते, आणि ती आपली मन:कामना पूर्ण होण्यासाठी वास्तवाचे तर्कशास्त्र आपण बिघडवून टाकतो.लहानसे का असेना विरोधी तोंड बंद करून टाकावे ही प्रवृत्ती हुकुमशाही प्रवृत्तीची असते.ज्याच्या व्देषाचा फणा क्षणार्धात उभा रहात नाही असा संपादक सरकारविरोधी लेखन कधीच करू शकणार नाही.< निखळ सत्य!
mukund parelkar
7 वर्षांपूर्वीhe was publishing saptahik SOBAT. Publish few from those.
mrin
7 वर्षांपूर्वीसोबत लहानपणी येत असे घरी, शाळेत होते तरी वाचत होते तो. त्यामुळे हे वाचायला मजा आली.
ravindrakulkarni
7 वर्षांपूर्वीकसला प्रमाणिक व छान लेख आहे... आवडला
Kulprakash Singh likhari
7 वर्षांपूर्वीsuper
mugdha bhide
7 वर्षांपूर्वीeka sampadakache swatawarache bhashya kadhich wachanat aale navate. lok tyanchyakadun nehami samajik bhashyach apekshitat. khoop chhan watale wachun. eka sachchya vruttapatrachi duari baju samor aali.