ह्या गंगेमधिं गगन वितळले...


अंक – सत्यकथा, जून १९५१ लेखाबद्दल थोडेसे :  बाळ सीताराम मर्ढेकर ( १ डिसेंबर १९०९-२० मार्च १९५६) हे मराठीतील आजवरचे सर्वाधिक 'लिहिले गेलेले', 'चिकित्सा केले गेलेले' कवी आहेत. त्यांच्या कवितांची संख्या फार नाही, परंतु एकेका कवितेवर लिहिलेल्या समीक्षात्मक लेखांची संख्या मोठी असेल. त्यांच्या मृत्यूला साठहून अधिक वर्षे झाली आहेत तरीही त्यांच्या कवितांच्या नवनव्या अर्थाचे विविध पदर उलगडवून दाखविण्यास समीक्षक उत्सुक असतात. मर्ढेकरांच्या ज्या कवितांचे गुढ सौंदर्य वारंवार साद घालते त्यात 'पिपांत ओल्या मेले', 'बढवित टिर्र्या अर्धपोटी' या कवितांएवढीच 'ह्या गंगेमधिं गगन वितळले' ही कविताही महत्वाची आहे. मर्ढेकर हयात असतानाच १९५१ साली सत्यकथेत प्रस्तुत लेख प्रसिद्ध झाला होता. कवीच्या हयातीतच त्याच्या काव्याची अशी चर्चा होण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. हा लेख वाचताना कविता तर कळतेच, मर्ढेकरही नव्याने कळतात, आवडू लागतात.

सत्यकथा मासिकात जून १९५१ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च...

********

मराठी कवितेच्या इतिहासांत मर्ढेकरांचे स्थान स्वतंत्र आहे. मर्ढेकर आजच्या नवकाव्याचे युगप्रवर्तक असले तरी मर्ढेकरांची कविता आणि इतर नवकाव्य यांत मोठाच फरक दिसतो. याचे मुख्य कारण म्हणजे मर्ढेकर हे अतिशय आत्मनिष्ठ कवि आहेत. त्यांच्या गाण्यांतील भावभावना, कल्पना, प्रतिमा वगैरे सारेच विश्व खास मर्ढेकरांचे आहे. त्याचे अनुकरण करतां येणार नाही. म्हणनच मर्ढेकर संप्रदाय हा शब्दप्रयोग अर्थहीन ठरतो. मर्ढेकरांच्या काव्यांत आशय आणि अभिव्यक्ती यांत एकजीवपणा आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कविता रसास्वाद , कविता , सत्यकथा
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Pralhad Bhope

      3 वर्षांपूर्वी

    संपूर्ण लेख दिसत नाही..

  2. vrushali padalkar

      3 वर्षांपूर्वी

    Lekh Disat Nahi

  3. rajandaga

      5 वर्षांपूर्वी

    Uttam



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts