वेळ झाली निघून जाण्याची...


अंक : लोकसत्ता, रविवार विशेष २००३ लेखाबद्दल थोडेसे  : सुरेश भट आणि मराठी गजल हे समानार्थी शब्द आहेत. मराठीत गेल्या तीस-चाळीस वर्षात गजल लिहिणारे गल्लोगल्ली झाले. परंतु एखादा उत्तम शेर, एखादी चांगली गजल जमली की तीच आयुष्यभर डोक्यावर घेऊन नाचणारांची संख्याच अधिक. सुरेश भटांनी मात्र प्रत्येक गजल सारख्याच वजनाची लिहिली. कोणतीही गजल घ्या, तीत त्यांच्या प्रतिभेचे प्रतिबिंब दिसतेच. या गजलांना जेंव्हा स्वरसाज चढतो तेंव्हा ती एखाद्या सुंदरीनं शृंगार करावा तशी रसिकांना भेटते. गजल नवाज भीमराव पांचाळे यांनी अनेक मराठी गजलांना असा स्वरसाज चढवला आहे. पांचाळे यांची गजलशी पहिली गाठ पडली ती भटांच्या साक्षीनेच. सुरेश भट यांचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाल्यावर त्यांना श्रद्धांजली वाहणारा हा लेख पांचाळे यांनी लोकसत्तामध्ये लिहिला होता. भीमराव पांचाळे हे केवळ संगीतकार नाहीत तर त्यांनी अनेक नव्या गजलकारांनाही प्रकाशात आणले, गजलची चळवळच राज्यभर उभी केली.  त्यांनी स्वरबद्ध केलेल्या भटांच्या काही गजलांचा उल्लेख प्रस्तुत लेखात आहेच. या शिवाय, इतर काही गजलकारांच्या 'अंदाज आरशाचा वाटे खरा असावा', 'मी किनारे सरकताना पाहिले', आयुष्य तेच आहे अशा इतरही अनेक अप्रतिम गजला भीमराव यांनी बांधलेल्या आहेत. हा लेख वाचल्यावर त्याही जरुर ऐका. ******** “हे पाह्य, मी तुले सांगून ठेवतो भीमराव – येणारा काळ गजलाचाच आहे... लक्षात ठेव!” हे ब्रह्मवाक्य ठासून मनावर बिंबवणाऱ्या मराठी गजलच्या खलीफाला मृत्यू घेऊन गेला... मराठी गजल पोरकी झाली... सुरेश भटांच्या तब्येतीतील चढउतार बराच काळ बघत होतो. त्यामुळे घडले ते फार अनपेक्षित नव्हते, तरीही त्यांच्या जाण्याने निर्माण झा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लोकसत्ता , मृत्युलेख​ , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    मस्त लेख

  2. Anita Punjabi

      4 वर्षांपूर्वी

    हृदयाला भिडणारा लेख!

  3. Sadhana Anand

      4 वर्षांपूर्वी

    फारच सुरेख लेख

  4. drmayakamble@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    खुप सुंदर मांडणी, भटांच्या गझला चे आशय, त्यांचे स्वभाव वर्णन अत्यंत बोलक्या शब्दात मांडले .खुप आवडले!

  5. kulkarniravindra6@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    लेख खूप छान वाटला.मला खरंतर गजल मधलं फारसं कत नाही. पण सुरेश भटांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. ह्यातील गजला छान वाटल्या.

  6. arvindjoshi

      5 वर्षांपूर्वी

    या लेखासोबत आँडियो हवा होता

  7. pvanashri

      5 वर्षांपूर्वी

    छान लेख

  8. mukunddeshpande6958@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    अप्रतिम

  9. suhasnannajkar07@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    खुप सुंदर लेख

  10. jsudhakar0907

      5 वर्षांपूर्वी

    'गजल' या काव्यप्रकाराला मराठी साहित्यविश्वात (साता समुद्रापार / देश-विदेशात) लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेलेले हे दोन्ही प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वं !! पूर्वी परभणी येथे दरवर्षी त्रैभाषिक कवीसंमेलन व्हायचे. १९९० च्या दशकात (माझ्या महाविद्यालयीन जीवनात) अशा त्रैभाषिक कवीसंमेलनात आदरणीय सुरेश भट साहेबांना प्रत्यक्ष ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. .......श्री भिमराव पांचाळे सरांची देखील एक र्‍हद्य आठवण सांगण्याचा मोह आवरत नाही. सन १९९५ अथवा १९९६ असेल, मी आणि माझा मित्र (श्री संतोष) बीड येथे त्यावेळच्या मराठवाडा ग्रामीण बँकेत कार्यरत होतो. बँकेतून पायी घरी जात असताना आम्हा दोघांची मराठी साहित्यावर चालू असलेली कसली तरी चर्चा, बस स्टँड समोर त्यांच्या वाहनाच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या श्री भिमराव पांचाळे सरांनी ऐकली आणि त्यांनी आमच्याशी संवाद सुरु केला. नंतर आम्ही तेथेच 'श्रीकृष्ण उडपी' या हाॅटेलात चहा सोबत त्यांच्या गजलांचाही मनमुराद आस्वाद घेतला होता. आम्ही स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजतो की, अशा महान प्रतिभावंतांचा अत्यल्प का होईना पण सहवास आम्हाला लाभला आणि विशेष म्हणजे विनम्र असणं म्हणजे काय असतं ते अनुभवता आलं / शिकायला मिळालं. पुन्हा एक-दिड वर्षापूर्वी श्री पांचाळे सरांना बीड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या अत्यंत बहारदार अशा कार्यक्रमात ऐकण्याचा योग आला. ..........या दोन्ही प्रतिभावंतांना विनम्र अभिवादन !!! 'पुनश्च' ला मनःपूर्वक धन्यवाद !!!

  11. purnanand

      5 वर्षांपूर्वी

    खूप. सुंदर लेख !

  12. purnanand

      5 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर लेख !

  13. sumamata@gmail.com

      5 वर्षांपूर्वी

    भट विक्षिप्त वागत .माझ्या प्रतिभा निकेतन महाविद्यालयात त्यांचा गजल गायनाचा कार्यक्रम झाला होता ते नशेत होते तरी सुंदर आपल्या रचनांचे सुंदर सादरीकरण करीत होते."देखावे बघण्याचे वय निघून गेले ' या व अन्य गजल ला वन्स मोर



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts