अंक : दीपावली १९७० लेखाबद्दल थोडेसे : दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हटले जाते. आज हजारो कोटींचा व्यवसाय असलेल्या या उद्योगाची पायाभरणी त्यांनी केली. त्यासाठीचे कष्ट तर महत्वाचे आहेतच, त्याहूनही अधिक महत्वाचे आहे ते या नव्या कलेला मोठे भवितव्य आहे हे ओळखण्यातली दूरदृष्टी. आज आपल्या जगण्याचा अपरिहार्य भाग झालेल्या चित्रपट माध्यमाच्या जन्मकळा त्यांनी कशा सोसल्या त्याचे आणि त्यांच्या एकूण आयुष्याचे थोडक्याच शब्दचित्र या लेखात आहे. पन्नास वर्षांपूर्वी फाळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा लेख लिहिला गेला होता. या लेखाचे लेखक पुरुषोत्तम बावकर हे स्वतः प्रसिद्ध वृत्तचित्र निर्माते आणि चित्रपट इतिहासाचे जाणकार होते. ******** भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह श्री. दादासाहेब तथा धुंडिराज गोविंद फाळके यांनी वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी चित्रपटासारख्या नव्या धंद्याचे बीजारोपण केले. वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी दादासाहेब परलोकवासी झाले. म्हणजे चित्रपटधंद्याचे बीजारोपण केल्यावर सुमारे बत्तीस वर्षे दादासाहेब जिवंत होते. ह्या बत्तीस वर्षांपैकी पहिली आठ वर्षे, म्हणजे इ.स. १९१९-२० पर्यंत, दादासाहेब कार्यमग्न होते. इ.स. १८१८ मध्ये ‘फाळकेज फिल्म्स लि.’ दादासाहेबांना बंद करावी लागली. आणि नंतर पाच भागीदारांच्या साहाय्याने दादासाहेबांनी ‘हिंदुस्थान फिल्म्स कंपनी’ची स्थापना केली. या नव्या कंपनीसाठी दादासाहेबांनी ‘कालिया मर्दन’ आणि ‘श्रीकृष्ण जन्म’ असे दोन चित्रपट निर्माण केले. आणि यानंतरच दादासाहेबांच्या कारकीर्दीला उतरती कळा लागली. चित्रपटसृष्टीच्या रौप्यमहोत्सवाच्या वेळी म्हणजे इ.स. १९३९ साली, ‘सण्डे टाईम्स’ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, दीपावली
, उद्योगविश्व
, चित्रपट जगत
, व्यक्ती विॆशेष
mukunddeshpande6958@gmail.com
5 वर्षांपूर्वीफार छान
mailimaye@gmail.com
5 वर्षांपूर्वीSundar !!!!
jrpatankar
5 वर्षांपूर्वीकष्टाशिवाय मोठेपण नाही. हेच खरे.
manisha.kale
5 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख व माहिती.
shripad
5 वर्षांपूर्वीअप्रतिम!
Sunilgandhi153@gmail.com
5 वर्षांपूर्वीछान लेख आहे. खरेच, ऊगीच नाही दादासाहेब फाळकेंं ना चित्रपट महषीँ म्हणतात.