दिवाळी अंक- १९४७

पुनश्च    अज्ञात    2020-12-12 06:00:05   

अंक – रसना, जानेवारी १९४८

लेखाबद्दल थोडेसे : दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे,कथा-कवितांचे विश्लेषण करुन त्या त्या वर्षाचे एक समग्र चित्र मांडायचे ही अतिशय चांगली प्रथा अलिकडे लोप पावताना दिसत आहे. खरे तर अशा प्रकारच्या आढाव्यातून एकत्रितपणे वातावरणाचा अंदाज येत असतो. १९४७ साली म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या वर्षात कुठले राजकीय-सामाजिक विषय समाजाच्या डोक्यात घोळत होते, त्याचा अतिशय सुंदर असा आढावा आजच्या लेखात घेतलेला आहे. मूळ लेख जानेवारी १९४८च्या रसनाच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. हा लेख वाचताना आपण त्यातील मुदद्द्यांचे गेल्या काळाच्या संदर्भात आपसूकच परिशिलन करतो. या धर्तीवर असा आढावा पुन्हा सुरु व्हायला हरत नाही. लेखाच्या लेखकाने आपली ओळख एक गंभीर वाचक’ अशी दिली आहे, यावरुन लेखातील मुद्दे थोडे वादग्रस्त आहेत याची कल्पना येते.

..................

दिवाळी म्हणजे चमचमीत जेवण आणि चुरचुरीत वाचन! जड अन्न हलके (लाइट) वाचन! आपण दिवाळी याप्रमाणे पार पाडली. पुन्हा ही स्वातंत्र्यातली पहिली दिवाळी! आतां दिवाळीनंतर थोडेसे गंभीर व्हावयास हरकत नाही. दिवाळी अंकांतल्या कथा, कविता इत्यादी मजकुराच्या आसपास राजकीय, सामाजिक इत्यादी विषयावर जे लेखन झालेले आहे त्याकडे वाचकांचे मुद्दाम लक्ष वेधण्यासाठी हे धावते टांचण केले आहे.

नव्या राजवटीत जे वातावरण निर्माण झाले आहे, त्यांत अनेक प्रश्न चर्चेचा विषय झालेले आहेत. जमातींचे संबंध, भाषा, प्रांताप्रांताचे संबंध, भाषा भाषांचे संबंध, आर्थिक संबंध अशा अनेक प्रश्र्नांची चर्चा दिवाळी अंकांतून झालेली आहे. इतका आणि इतका गंभीर मजकूर यापूर्वी दिवाळी अंकांत क्वचितच आला असावा.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


रसना , समाजकारण , इतिहास
रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. साधना गोरे

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts