अंक :अंतर्नाद, जून २०१५
माजी कुलगुरू डॉ. निगवेकर ह्यांनी सांगितलेला एक किस्सा आठवतो. मी औरंगाबादला आल्यावर सुरुवातीलाच एका कार्यक्रमात आमची भेट झाली. तेव्हा मला शुभेच्छा देतांना ते म्हणाले – “कुलगुरुपदाच्या संदर्भात मला वऱ्हाडी माणसं ह्या नाटकातील एक संवाद आठवतो. त्यातील सासरा नव्याने घरात आलेल्या आपल्या सुनेला म्हणतो – बाई ग, तुझ्या पदरात जळते निखारे आहेत. तुझ्यावर दुहेरी जबाबदारी आहे. निखारे तर विझू द्यायचे नाहीत अन् पदरदेखील जळू द्यायचा नाही!”खरेच, कुलगुरुपद म्हणजे तशीच तारेवरची कसरत आहे. २८ मार्च २०१४ रोजी माझ्या ६५व्या वाढदिवशी मी ह्या पदावरून कार्यकाळ संपल्याने निवृत्त झालो. माझा वाढदिवस पहिल्यांदाच माझ्या कार्यकर्तृत्वाच्या आड आला! पण माणसाला कुठे ना कुठे थांबायचे असते. कुणी कुणाला जन्मभर पुरत नाही हेही तितकेच खरे.
कुरुगुरुपदाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडणे, त्या काळातील आत्मचरित्राचे एखादे प्रकरण लिहिणे हा या लेखनाचा उद्देश नाही. उलट मी निवृत्त होतच अंतर्नादच्याच संपादकांनी सुचविल्याप्रमाणे त्या अनुभवांवर आधारित नव्या पिढीला, तरुणांना प्रोत्साहक, प्रेरणादायी ठरणारे लेखन करावे हा उद्देश आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .