एकदाच पाहिलेले गांधीजी

पुनश्च    दि. बा. मोकाशी    2021-07-19 16:00:02   

तेव्हा मी कल्याण येथे राहत होतो, आणि सत्याग्रहींची नोंदणी मुंबईत काँग्रेस हाऊस मध्ये होती. स्टेशनावर येऊन विनातिकीट प्रवास सुरू केला. बोरीबंदरवर उतरून चालत गिरगावात आलो. काँग्रेस हाऊस शोधले. तिथे वरच्या मजल्यावर एक माणूस टेबलाशी सत्याग्रहींची नोंदणी करीत बसला होता. पंधरावीस सत्याग्रही रांग लावून उभे होते. मीही रांगेत नंबर लावला.

अर्ध्या तासाने माझा नंबर सरकत टेबलाशी आला. तोपर्यंत मला घाम फुटला होता. पण तोंडावर हिंमत ठेवली होती. टेबलावरच्या माणसाने एकदा माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. माझा आखूड सदरा ओढून मी अर्ध्या चड्डीवरचा शाईचा डाग झाकण्याचा यत्न केला. अनेकदा मारामारी करण्यास वापरल्याने चुरगळलेली टोपी मी बोटाने दाबू लागलो. महात्मा गांधींनी या बालसत्याप्रहीला पाहिले असते तर विनोबांऐवजी यालाच मिठाची पहिली मूठ उचलायला सांगितली असती ! पण टेबलावरच्या माणसाने मला अधिक जवळ बोलावून नाव विचारले आणि इतरांचे घेतले तसे ते टिपून न घेता तो उगाच प्रश्न विचारू लागला. त्याने विचारले-

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


युगात्मा
प्रासंगिक

प्रतिक्रिया

  1. Kiran Joshi

      4 वर्षांपूर्वी

    हो. गांधीहत्या हा शब्द प्रयोग असता तर बरं झालं असतं. त्यावेळच्या संघीय ब्राह्मण वर्गामध्ये गांधीवध हा शब्द रूढ होता मला वाटतं. स्वतःला बदलवता येते हा विचार बापूंनी दिला....आणि म्हणूनच मला ते आदरणीय व माणूस म्हणून विशेष वाटतात.

  2. Suhas Joshi

      4 वर्षांपूर्वी

    फारच छान, ललित अंगाने जाणारा... असेच गांधी चे दर्शन गोनीदां ना वर्धा येथे झाले होते, त्यांनी हि गांधी चा तांबूस गोरा रंग असाच ( स्मरण गाथेत ) नोंदवला आहे

  3. Swapnil Patil

      4 वर्षांपूर्वी

    लेख खूप सुंदर होता, पण गांधी वध पेक्षा गांधी हत्या हा शब्द वापरायला हवा होता...



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts