गांधी : एका युगाचा चेहरा
ज्याच्या नजरेला तो जगत असलेल्या शतकाची
हिंस्र स्वप्ने कैद करू शकली नाहीत;
आणि इतिहासाच्या दर्पणात
ज्याच्या समर्पणाचीच प्रतिमा
भविष्यातील पिढ्यांना दिसेल, असा.
गांधी : एक हिमनग
ध्रुवभूमीवरून शीतप्रवाहांच्या सोबतीने
व उष्णवृत्तांच्या रोखाने निघालेला,
ज्याचे प्रचंड प्राचीन सात अष्टमांश पाण्याखाली
आणि जो फक्त एका ठेंगण्याशा उंचवट्याइतका वर.
त्याने क्षितिजाशी डोके वर काढले
तेव्हा अफाट समुद्रात वाट चुकल्यासारखे
बावळट वाटण्याइतपत साधे सरळ त्याचे ध्यान होते;
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Geetanjali Joshi
4 वर्षांपूर्वीबाबा महामानव होते हे माहित होते. मोठे कवी होते सेवाव्रतीहोते हेही माहीत होतं. पण ते अचूक समर्पक लिहिणारे मर्मज्ञ लेखक होते हे आज कळलं....