श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांमुळे कार्यक्रमाविषयीचे कुतूहल जसे वाढूं लागले आहे तसेच महत्त्व कार्यक्रम सादर करण्याच्या पद्धतीलाही आहे. या कार्यक्रमांचे महत्त्व ध्यांनी घेऊन आकाशवाणीने या खास कार्यक्रमाच्या लेखनाची जबाबदारी पुष्कळ अंशी स्वतःच्या लेखकावर टाकली हे. कार्यक्रम-निर्मितींत वरचेवर काय प्रयोग करावेत, रुक्ष विषय कसा खुमासदार करावा, कोणत्या विषयाला कोणत्या प्रकारच्या आविष्काराची जोड द्यावी, वियाची मांडणी कशा तऱ्हेने केली असतां ती श्रोत्यांच्या मनावर ठसूं शकेल, आठवड्यांतून दोन वेळां होणाऱ्या या कार्यक्रमांतील एकसुरीपणा कसा घालवावा आणि आपल्या श्रोत्यांची आवडनिवड लक्षांत घेऊन मनोरंजनांतून लोकशिक्षणाचे हे कार्य सतत कसे करावे, याची काळजी हा लेखक घेतो आणि ग्रामीण जीवनाची नाडी हातांत असलेले कुशल संयोजक त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .