अंकः महाराष्ट्राचे थोर पुरुष - लोकहितवादी , वर्ष १९४९
इंग्रजांहून हिंदी माणसे बुद्धीने वरचढ असूनही त्यांना आज परवशतेचे लज्जास्पद दैन्य भोगावे लागत आहे याचे कारण त्यांच्या निस्सीम अज्ञानाशिवाय, आळसाशिवाय दुसरे नाही. हिंदुस्थानात जेव्हा ज्ञान होते तेव्हा स्वराज्य होते, ऐश्र्वर्य होते, परंतु अलीकडच्या दोन हजार वर्षांत ज्ञानाचे संवर्धन थांबले. पुराणांतील जातिभेद, व्रतवैकल्यांचा पुंडावा या विषयींची आवड लोकांत बळावून जगात काय चालले आहे, जगाच्या चढाओढीत आपले स्थान आणि कर्तव्य कोणते, यासंबंधाचा चौकसपणा ठार झाला. काल मुसलमानांनी देश काबीज केला, तुडवला; आज इंग्रज छातीवर चढून बसले, तरी लोकांना त्याचा विषाद नाही, उद्वेग नाही. असल्या सहनशील चेचाड वृत्तीमुळे स्वराज्य, स्वातंत्र्य ही साफ बुडाली व पारतंत्र्याचे दैन्य बोकांडीस बसले अशा अर्थाची मते लोकहितवादींच्या अनेक लेखांतून पसरलेली आहेत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .