अंक : हंस, फेब्रुवारी १९५६
वीर, करुण, हास्य, इत्यादी रसांप्रमाणंच शृंगार हा एक रस आहे. नव्हे, तो प्रधान रस आहे. आणि अनुरूप प्रेमिकांच्या शृंगारचेष्टांप्रमाणंच खलपुरुषांच्या शृंगारचेष्टितांची वर्णनं साहित्यांत यायचींच. प्रेमिकांच्या कामपीडेची वर्णनं वाचून आल्हाद होतो. दुष्टांचे जुलुमी कामाचार बघितले की घृणा उत्पन्न होते. सबंध जीवन चित्रित करण्याची प्रतिज्ञा ज्यानं केली त्या साहित्यिकाला शृंगार आणि बलात्कार दोन्ही सारखेच वर्ज्य वाटतात. रसोत्पत्तीच्या दृष्टीनं दोन्ही विषयांत त्याची लेखणी रंगते. आणि जो खरा रसिक असतो त्याला दोन्हींतही त्या त्या रसाचा आस्वाद मिळतो. सर्व काळच्या सर्व सुंदर साहित्यांत स्त्री-पुरुषांची प्रीति आणि शृंगार भरलेले आहेत, त्याचप्रमाणं बलात्कारांची वर्णनं विपुल आहेत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीछान लेख आहे . सर्व पाचही लेख वाचले . वैचारिक साहित्याची मेजवाणी च होती .