दाजी शहारल्यासारखा झाला. कित्येक नखं बाहेर काढून ओरखडे काढणाऱ्या श्वापदासमोर बसल्याचा त्याला याही वेळी भास झाला. समोरचा मोठाथोरला आरसा एकदा तडकलेला होता, कडेच्या भिंगाचा एक तुकडा मागं एकदा निखळून पडला होता, लक्ष्मी पिसाळली होती तेव्हा. लक्ष्मी दाजीला मिठीतून सोडायला तयार नव्हती. दाजीचा जीव कासावीस झाला होता. रक्ताचं पांघरूण ओढून त्याचे प्राण छपायला पाहत होते, पण रक्ताला रक्ताचाच विळखा पडला होता. जिवाचा कोंडमारा झाला होता. दाजीनं मग सर्व शक्तीसह लक्ष्मीला उडवून लावलं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .