अंकः मराठी साहित्य पत्रिका, ऑक्टोबर-डिसेंबर १९९५
मला विनोदी कथा लिहायला आवडतं पण ते तितकंच कठीणही वाटतं.
मला फँटसीची कल्पना सुचली की मी खूष असतो. विनोदाच्या अंगानं जाणारी असली तर मी अधिकच खूष होतो. फँटसी आणि विनोद या दोन तारांवरची कसरत दर पावलागणिक तुम्हाला खूप गमती सुचवत असते. फार्सिकल विनोदालाही ती आव्हान देत असते.
प्रॅक्टिकल जोक. हा प्रकार तर रंजकच रंजक. त्याला मूलतःच विनोदाच अधिष्ठान लाभलेलं असतं. हा विनोद निरोगी आणि दिलखुलास असतो. अशा प्रॅक्टिकल जोकमधून विनोदी कथा उत्तमपैकी विणता येते. त्यासाठी मात्र तुमच्या मनात एक खट्याळ, खोडकर, वात्रट लेखक असावा लागतो.
सचिवालयात नोकरीला असताना कधीकधी वाट वाकडी करून मी म्युझिअमच्या बाजूनं जायचो. तिथल्या काळ्या घोड्याची ऐट बघण्यसाठी माझी पावलं काही क्षण तरी थांबायचीच. एकदा मनातल्या लेखकाच्या मनात आलं, हा घोडा खिंकाळला, त्यानं हालचाल केली तर काय होईल?
आणि मला ‘काळा घोडा’ ही विनोदी कथा सुचली.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Ravi Shenolikar
4 वर्षांपूर्वीछान लेख. शन्नांचं नर्म विनोदी, खुसखुशीत लेखन नेहमीच आवडायचं.
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीसाधारण लेख वाटला .