धूर्तांची पंचकडी


अंक - आलमगीर, दिवाळी अंक १९५९

“मी एक शेतकरी होतो. माझं शेत एका डोंगराच्या पायथ्याला होत. एकदां शरद् ऋतूंत मी शेतावर काम करीत असतां क मदोन्मत्त हत्ती माझ्यावर चालून आला. जीवरक्षणासाठी मी जवळच्याच एका तिळाच्या झाडावर चढलो. पण हत्ती माझा पिच्छा सोडीना. त्यानं तिळाच्या खोडाला आपल्या सोंडेचा विळखा घालून ते झाड पाडायचा प्रयत्न केला. झाड कांही पडलं नाही; पण गदगदा हालल्यामुळे त्याच्यावरचे तीळ मात्र सगळे खाली पडले. हत्तीनं झाडाभोवती रिंगण धरलं होतं, त्यामुळे ती तिळांची रास चिरडली गेली. त्यामुळे त्या तिळांतून तेलाची नदी वाहू लागली. खाली राहिली पेंड. ती बिलबिलित होती. हत्तीचे पाय त्या पेंडीच्या लगद्यात रुतले आणि तो तडफडून मेला. मी लगेच झाडावरून खाली उतरलो. मला लागली होती भूक. मी पहिल्या सपाट्याला दहा घडे तेल पिऊन टाकलं. मग त्या हत्तीचं कातडं सोलून त्याची पखाल बनवली आणि ती तेलाने भरून घेतली. मग घरी जायला निघालो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


आलमगीर , कथा
कथा

प्रतिक्रिया

  1. Shriniwas Kalantri

      3 वर्षांपूर्वी

    छान .

  2. Prakash Ghatpande

      3 वर्षांपूर्वी

    सुंदर कथा. मानवी स्वभावाचे धूर्त पैलू त्या काळाच्या पार्श्वभूमीवर अगदी मनोरंजक.

  3. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    युक्ती मोठी.चांगल्या व वाईट कामासाठी.

  4. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    छान लेखन - आवडले . खरचं असं लेखन करायला उच्च दर्जाची काचना शक्ती असायला हवी

  5.   3 वर्षांपूर्वी

    वाह.. अप्रतिम.. अशा अविश्वसनीय कथांची रचना करणे कठीण काम आहे.. हरिभद्रसुरीची ही कथा वाचून आनंद झाला..



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts